नाग नदी प्रदुषण निर्मूलन प्रकल्पासंदर्भात ‘जिका’ चमूचे काम सुरू

Date:

नागपूर : ‘नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा’साठी जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) अर्थसहाय्य करणार आहे. या अर्थसहाय्यासाठी २८ नोव्‍हेंबरला ‘ जिका’ आणि मनपामध्ये करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

प्रकल्पाच्या नियोजनासंदर्भातील कामाला लवकरच सुरूवात होणार असून त्याच्या अंमलबजावणीसाठी बुधवारी (ता. ९) महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात प्रकल्पासाठी ‘जिका’ने नियुक्त केलेल्या कन्स्लटंटचे शिष्टमंडळ व मनपा प्रशासनात बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीला आयुक्त अभिजीत बांगर, अपर आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, नितीन कापडनीस, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, मो. शफीक, एनजेएसचे प्रकल्प सल्लगार विद्याधन सोनटक्के, डॉ. प्रणीता उमरेडकर, संदीप लोखंडे, श्री. जीवतोडे, प्रकल्पासाठी ‘जिका’ने नियुक्त केलेल्या निप्पॉन कोई इंजिनिअरींग कन्स्लटंटचे ताकामासा निशिकावा (Takamasa NISHIKAWA), केईसुके ओ काझाकी (Keisuke O kazaki), युईच रो कोन्नो (Yuich ro Konno), तायसुके वॉटनबे (Taisuke WATANABE), ‘जिका’चे प्रोग्रॅम स्पेशॅलिस्ट काओरी होंडा (Kaori HONDA), ‘जिका’चे चिफ डेव्‍हलपमेंट स्पेशॅलिस्ट एम.पी. सिंग, समन्वयक अंजन बोराह उपस्थित होते.

नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प हा नागपूरसाठी महत्त्वाकांक्षी आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी करिता ‘जिका’चे तांत्रिक सल्लागार प्रकल्पाची चाचणी करून चार महिने काम करणार आहेत. याबाबत मनपा प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे अधिकारी ‘जिका’ चमूला आवश्यक तांत्रिक सहकार्य करेल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी चर्चेदरम्यान सांगतिले.

प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा अहवाल जपान सरकाला ‘जिका’ चमू सादर करणार असून त्यांच्या मंजुरीनंतर केंद्र शासन व जपान सरकार यांच्यामध्ये याबाबत करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रकल्प मोठा असल्यामुळे यास कॅबिनेट काउंसिलची मान्यता घ्यावी लागू शकेल, असे तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांनी यावेळी सांगतिले.

अधिक वाचा : नागपूर में फैशन शो में रैम्प पर उतरे ‘दिव्यांग

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...