वाघाचे नख विकणा-यास जरीपटका पोलीसांनी केली अटक

Date:

नागपुर : जरीपटका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग पोटे आपल्या पथकासह गस्तीवर असताना अवैधरीत्या वाघाचे नख विकणाऱ्या व्यक्तीस त्यांनी अटक केली.

पोलीसांना गुप्त माहिती मिळाली होती कि एक व्यक्ती दयानंद पार्क, जरीपटका परिसरातील ‘पार्क पाराडाइज रेस्टॉरंट’ येथे वाघाचे नख विकण्यासाठी आला आहे. त्या आधारावर पोलीसांनी सापळा रचुन त्या व्यक्तीस रंगेहात पकडले. अंग झडतीत पथकाने त्याचे कडून 1 नग वाघाचे नख जप्त केले. मंगेश उर्फ मोनू दिलीप बोदोले (27 वर्ष), रा. नागार्जुन कॉलोनी, जरीपटका, नागपूर असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात वनसंरक्षक आरएफओ गंगावणे यांना माहिती देण्यात आली असून पुढील कारवाई करीता त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

ही कारवाई पोलिस उपायुक्त-5, श्री हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात परशुराम कार्यकर्ते, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे, पोलीस हवालदार संजय रायसने, पोलीस शिपाई अरविंद काळबांडे, पोलीस शिपाई संदीप वानखेडे, पोलीस शिपाई आशिष सातपुते यांनी केली.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related