जरीपटका सामूहिक बलात्कार प्रकरण : चारही आरोपींना अटक

Date:

नागपूर : मित्रासोबत शरीर संबंध प्रस्थापित करणाऱ्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना जरीपटका पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यश मेश्राम, अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार आणि रितिक मोहरले अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा १ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला आहे.

तक्रार करणारी मुलगी १५ वर्षाची असून तिच्या घराजवळच आरोपी यश मेश्राम राहतो. त्याच्यासोबत तिची मैत्री आहे. २५ ऑगस्टच्या सायंकाळी ६.३० च्या सुमारास यश आणि तक्रारदार मुलगी दुचाकीने फिरायला गेले. नारा गावाजवळच्या गंगोत्री लॉन जवळ निर्जन ठिकाणी या दोघांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यांच्या मागावर असलेले आरोपी अभिनेश देशभ्रतार, अमित बोलके आणि रितिक मोहरले यांनी त्या दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. त्यानंतर आरोपींनी तिला शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देताच तुला बदनाम करू आणि जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन तिचे तोंड दाबून आरोपी देशभ्रतार, बोलके तसेच मोहरले या तिघांनी तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. बदनामीच्या आणि जिवाच्या धाकाने मुलगी गप्प बसली.

म्हणून झाली तक्रार
सोमवारी सकाळी ती मुलगी दूध आणायला गेली असता आरोपी देशभ्रतारने तिला गाठले. मागच्यासारखेच आज करायचे आहे, तू आज तयार राहा. ठरल्या वेळेत तू आली नाही तर जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घरी आली आणि रडत बसली. तिच्या आईने तिला कारण विचारले असता तिने झालेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने आपल्या नातेवाईकांना घरी बोलावून सोमवारी रात्री जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडित मुलीचे बयाण नोंदविल्यानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

आरोपींकडून गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. ते सर्व पाण्याच्या टँकरवर काम करतात. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा १ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांचा गुन्हेगारी अहवाल तपासला जात असल्याचे जरीपटका पोलिसांनी सांगितले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...