IPL 2021 : KKR चा कॅप्टन होण्याची अनुभवी खेळाडूनं दाखवली तयारी

IPL 2021 हंगामात मोठा सेटबॅक, KKR च्या खेळाडूंना करोनाची लागण; आजची लढत पुढे ढकलली

आयपीएल 2021 चा (IPL 2021) दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) समोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

मुंबई, 4 जून : कोरोना व्हायरसच्या (coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2021) 29 मॅच नंतर स्थगित करावी लागली. आता उर्वरित 31 सामने सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) समोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

इंग्लंडचे क्रिकेटपटू उर्वरित आयपीएल सामन्यांमध्ये खेळणार नाहीत असं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे केकेआरचा कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) यूएएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता केकेआर मॅनेजमेंटवर पुन्हा एकदा कॅप्टन शोधण्याची वेळ आली आहे.

आयपीएल 2018 चा सिझन सुरु होण्यापूर्वी दिनेश कार्तिककडे (Dinesh Karthik) केकेआरचं नेतृत्त्व सोपवण्यात आले होते. मागील आयपीएल सिझनमध्ये (IPL 2020) बॅटींगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्तिकनं कॅप्टनसीचा राजीनामा दिला आणि मॉर्गन कॅप्टन बनला. आता गरज पडली तर पुन्हा एकदा कॅप्टन होण्याची तयारी कार्तिकनं दाखवली आहे.

दिनेश कार्तिकनं ‘टाईम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना सांगितले की, “पॅट कमिन्सनं तो येणार नसल्याचं जाहीर केलं आहे. कॅप्टन मॉर्गन बद्दल बोलायचं झालं तर स्पर्धा सुरु होण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा अवधी आहे. या काळात बराच काही बदल होऊ शकतो. मात्र मला कॅप्टन होण्यासंदर्भात विचारणा केली तर मी यासाठी सज्ज आहे.”

दिनेश कार्तिकनं 37 मॅचमध्ये केकेआरची कॅप्टनसी केली होती. यापैकी 21 मॅचमध्ये केकेआरनं विजय मिळवला आहे. आयपीएलचे उर्वरित सामन्यांमध्ये इंग्लंडचे खेळाडू खेळावे यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न सुरु आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाले तर केकेआरचा प्रश्न मिटेल. अन्यथा त्यांना पुन्हा एकदा नवा कॅप्टन शोधावा लागेल. केकेआरचा कॅप्टन होण्याच्या शर्यतीमध्ये दिनेश कार्तिकसह आंद्रे रसेल देखील आघाडीवर आहे.