नागपूर : भारतातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये ७.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्चमध्ये हा दर ६.७ टक्के होता. बेरोजगारीचा एप्रिलमधील दर ऑक्टोबर २०१६ नंतरचा नीचांकी दर ठरला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) ही माहिती दिली आहे.
सीएमआयईचे प्रमुख महेश व्यास यांनी सांगितले की, मार्चमध्ये बेरोजगारीच्या दराचा कल काहीसा वेगळा होता. मात्र एप्रिलमध्ये त्यात वाढ झाली आहे.
बेरोजगारीची आकडेवारी सर्वसाधारणपणे दर पाच वर्षांनी जाहीर केली जाते. मात्र यासंबंधीची माहिती डिसेंबरमध्ये फुटली होती. २०१७-१८ मध्ये गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी नोंदवली गेली, असा दावा या आकडेवारीत केला होता. नोटाबंदीनंतर २०१८ पर्यंत एक कोटी १० लाख जणांनी रोजगार गमावले, असा दावाही सीएमआयईने केला आहे.
सत्ताधाऱ्यांना डोकेदुखी
सार्वत्रिक निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली असल्याने एप्रिलमधील बेरोजगारीच्या आकडेवारीवरून विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : ISRO eyeing to launch Chandrayaan-II rover in Moon’s South Pole