नवी दिल्ली – नुकतीच २०१८ च्या आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून अवघ्या क्रिकेटविश्वात ओळखल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तानचा सामना १९ सप्टेंबरला होणार आहे.
भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघाना आशिया चषकात सरळ प्रवेश मिळाला आहे. तर सहाव्या स्थानासाठी हाँगकाँग, मलेशिया, नेपाळ, ओमान, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरात या संघामध्ये क्वालिफायर लढत होणार आहे. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर जिंकणारा देश अ गटात तर बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतील. आशिया चषकाचा अंतिम सामना २८ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
वेळापत्रक
१५ सप्टेंबर – बांगलादेश वि. श्रीलंका
१६ सप्टेंबर – पाकिस्तान वि. पात्रता संघ
१७ सप्टेंबर – श्रीलंका वि. अफगाणिस्तान
१८ सप्टेंबर – भारत वि. पात्रता संघ
१९ सप्टेंबर – भारत वि. पाकिस्तान
२० सप्टेंबर – बांगलादेश वि. अफगाणिस्तान
सर्वोत्तम चार फेरी – २१ ते २६ सप्टेंबर
अंतिम फेरी – २८ सप्टेंबर
हेही वाचा : विराट कोहली २०१७ व २०१८ वर्षातील ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’