विराट कोहली २०१७ व २०१८ वर्षातील ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’

विराट कोहली Virat Kohli

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ला इंग्लंडच्या बार्मी आर्मीकडून २०१७ आणि २०१८ या वर्षासाठी ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यासंदर्भातील माहिती बीसीसीआयने बुधवारी रात्री ट्विटरवरून दिली. यानंतर कोहलीने या पुरस्कराबद्दल आभार मानले आहेत. बार्मी आर्मी हे इंग्लंड क्रिकेटर्सचे फॅनक्लब आहे.

दरम्यान, इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय संघ १ ऑगस्टपासून पाच दिवसीय कसोटी सामना खेळणार आहे. याआधी एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीने सर्वात कमी कालावधीत ३ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता.

अधिक वाचा : महिला हॉकी विश्वचषक : भारतीय संघासमोर आज आयर्लंडचे आव्हान

Comments

comments