नवी दिल्ली : चीन कडील आयात कमी करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. भारतीय रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि देशाचे चालू खाते नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने काही वस्तूंची आयात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयात कमी करण्याच्या वस्तूंमध्ये चिनी वस्तूंचे प्रमाण मोठे आहे. याचे मुख्य कारण असे आहे, की भारताचा चीनबरोबरचा व्यापार हा 63 अब्ज डॉलर्स इतका आहे. भारताने चीनकडील आयात कमी केली तर तो चीनसाठी मोठा धक्का असणार आहे. कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक्स, मशीनरी, ऑर्गॅनिक केमिकल्स, पशू, वनस्पती तेल, लोह आणि स्टील यांची चीनकडून मोठ्या प्रमांणात आयात केली जाते.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वस्त्रे, ऑटोमोबाईल्स आणि घड्याळे आदी वस्तूंची अनावश्यक म्हणून आयात बंद करता येईल.सर्वात मौल्यवान आयात वस्तूंत सोन्याचा समावेश आहे, पण जेव्हा जेव्हा सोन्याच्या आयातीवर बंदी घातली गेली, तेव्हा तेव्हा सोन्याची चोरटी आयात वाढली असा अनुभव आहे.
गेल्या वर्षी भारताने 33.7 अब्ज डॉलर्सचे सोने आयात केले. आयात-निर्यातीतील तफावत वाढण्याचे सोने हे एक मोठे कारण होते. सोन्याची आयात घटवण्याच्या हेतूनेच सरकारने गोल्ड बॉंड्स आणि गोल्ड डिपॉझिट योजना सादर केल्या आहेत. सन 2017-18 मध्ये भारताने 21 अब्ज डॉलर्सचे मोबाईल्स आणि टेलिकॉम सामग्री आयात केली. त्यामुळेच यांच्या देशांतर्गत उत्पादनाला सरकार उत्तेजन देता आहे.
अधिक वाचा : ‘इस्रो’कडून दोन ब्रिटीश उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण