नागपूर (प्रतिनिधी) : नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित आंतरशालेय नेमबाजी स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींमध्ये मानसी राऊतने सुवर्ण, तर अवनी अविष्कार देशमुखने रौप्यपदक पटकावले. तर याच वयोगटात मुलांमध्ये सोहम किशोर बागडेने सुवर्ण, तर निखिल ढोलेने रौप्यपदक पटकावले. ही स्पर्धा वंजारीनगर येतील लोहमार्ग पोलिसांच्या मुख्यालयातील शुटींग रेंजवर झाली.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक अनिल पांडे,क्रीडा अधिकारी त्रिवेनी बांते उपस्थित होते. शहर विभागातून स्वामी अवधेशानंद शाळेच्या मानसी राऊतने ३५२ गुण घेत प्रथम स्थानावर बाजी मारली. तर अजनी येथथील माऊंट कार्मेल स्कूलच्या आणि याच स्पर्धेत गतवर्षी सुवर्णपदक पटकावलेल्या अवनी देशमुखने पिपसाईट प्रकारात चार फेऱ्यांमध्ये ८०,८५,७८,७६ असे एकूण ३१९ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावले. अनवी देशमुख राष्ट्रीय नेमबाज अनिल पांडे यांच्या मार्गदर्शनात स्वावलंबीनगर येथील ऑरेंज सिटी स्पोर्टिंग कल्बच्या शूटींग रेंजवर नियमित सराव करते.
याच कामगिरीच्या जोरावर मानसी् आणि अवनीची पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तर याच वयोगटात स्कूल ऑङ्क स्कॉलर्सच्या सोहमबागडेने पिपसाईट प्रकारात ९३,९७,९४,८९ असे एकूण ३७३ गुण घेत अव्वल स्थान पटकावले.तर गुरु हरिकृष्ण शाळेच्या निखिल ढोबळेने ३२८ गुण घेत रौप्यपदक पटकावले.