कोरोना संकटात अनेक देशांनी भारतासाठी केले मदतीचे हात पुढे; जाणून घ्या! कोणाकडून काय मदत येणार

Date:

Corona Virus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारतावर मोठा तडाखा बसला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढू लागल्याने भारत सरकार समोर कोरोनाला रोखण्याचं आव्हान आहे. भारतातील कोरोना रुग्णांची स्थिती पाहून जगातील अनेक देशांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. जगभरातील दहा लहान मोठ्या देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन दिले आहे. मागील अनेक आठवड्यांपासून भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अमेरेकिनेही भारतात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ब्रिटननेही भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचे आणि शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिले आहे. भारतात गेल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णवाढ ही ३ लाखांहून अधिक झाल्याने जगभरात तो चिंतेचा विषय झाला आहे. अनेक राज्यांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचे हकनाक बळी गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनी ट्विटरवर भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. कोरोना उद्रेकानंतर भारताला आवश्यक ती सर्व मदत आम्ही देऊ असे म्हटले आहे.

स्वीडिश हवामान कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिने म्हटले आहे की, जागतिक समुदायाने ताबडतोब पुढे येऊन भारताला मदत करावी. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मॅरिसे पायने यांनीही भारताबाबत सहवेदना व्यक्त केली असून, ‘भारताने आम्हाला लशी पुरवून मोठे औदार्य दाखवले होते, आता भारतात दुसरी लाट आली असताना आम्ही त्या देशाला मदत करण्यास तयार आहोत’, असे स्पष्ट केले आहे. आपण भारताच्या मदतीसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया चीनकडून गुरूवारी देण्यात आली. कोरोना महासाथीच्या प्रादुर्भावातून वाचवण्यासाठी मदत आणि वैद्यकीय सामान देण्यासाठी आपण तयार असल्याचं चीनने म्हटले आहे. युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्लस मिशेल यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, युरोपीय समुदाय एकजुटीने भारतीय लोकांच्या पाठीशी आहे. ही केवळ भारताची एकट्याची लढाई नसून संयुक्त लढाई आहे. ८ मे रोजी भारत व युरोपीय समुदायाची बैठक होत असून त्यावेळी यावर चर्चा होईलच पण त्याआधी आम्ही मदत देण्यासही तयार आहोत.

कोणत्या देशाकडून भारताला काय होणार मदत
ब्रिटन
कोरोनाला हरवण्यासाठीच्या या युद्धामध्ये युनायटेड किंग्डम भारतासोबत असल्याचं म्हणत ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह काही ६०० मेडिकल डिव्हाईस भारताला पुरवले जाणार आहेत.

सौदी अरेबियाकडून वायूपुरवठा
सौदी अरेबियाने ८० मेट्रिक टन ऑक्सिजन भारताला पाठवला असून अदानी समूह व लिंडे कंपनी यांच्या सहकार्यातून हा ऑक्सिजन भारतात येणार आहे. रियाध येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, अदानी समूह व मे. लिंडे कंपनी यांच्या मदतीने ऑक्सिजन भारतात पाठवण्यात येत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, ८० मेट्रिक टन ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकरमध्ये भरून भारतात आणला जात आहे. दम्मम ते मुंद्रा या मार्गाने या टँकरचा प्रवास सुरू आहे.

पाकिस्तान देणार रुग्णवाहिका
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतातील परिस्थितीबाबत सहवेदना व्यक्त केली असून या आव्हानाशी जागतिक पातळीवर सामना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानमधील एइधी फाऊण्डेशनने भारताच्या मदतीसाठी ५० रुग्णवाहिका पाठवण्याची तयारी दर्शवली असून त्यासंदर्भातील पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात आले आहे.

सिंगापूर, संयुक्त अरब अमिर, आणि युरोपीय समुदाय व रशिया
सिंगापूरने चार क्रायोजेनिक ऑक्सिजन टाक्या पाठवल्या आहेत. ५०० बीआयपीएपीस, २५० ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साहित्य घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल झाले आहे.
संयुक्त अरब अमिरातीही भारतीय दूतावासाच्या मदतीने ऑक्सिजनच्या टाक्या पाठवण्याच्या विचारात आहे. युरोपीय समुदाय व रशिया यांनी ऑक्सिजन संबंधित व इतर औषधांची मदत भारताला देण्याचे ठरवले आहे.

जर्मनी
जर्मनीतून ऑक्सिजन निर्मितीचे २३ मोबाइल प्रकल्प एअरलिफ्ट करुन भारतात आणणार आहे. तंत्रज्ञांच्या मदतीने हे प्रकल्प देशात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत केले जातील. जर्मनीतून भारतात येत असलेल्या प्रत्येक प्रकल्पातून एका मिनिटात ४० लिटर याप्रमाणे दर तासाला २४०० लिटर द्रवरुप ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. उच्च दाबाने सिलेंडरमध्ये साठवलेल्या या ऑक्सिजनचा वापर रुग्णांसाठी केला जाणार आहे.

चीन
कोरोना महासाथीच्या प्रादुर्भावातून वाचवण्यासाठी मदत आणि वैद्यकीय सामान देण्यासाठी आपण तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. अमेरिकेनंतर भारताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चीनच्या माध्यमांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना प्रश्न विचारला होता. “चीन भारताच्या मदतीसाठी तयार आहे. कोरोनाची महासाथ ही संपूर्ण मानवांची शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे,” असे त्यांनी उत्तर देताना सांगितले.

अमेरिका
भारताच्या कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लससाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेतून लवकरच येणार आहे. अमेरिकेने कोरोना संकटाशी लढण्यासाठी भारताला सर्वोतोपरी मदत देण्याचे जाहीर केले आहे. यात लससाठीचा कच्चा माल, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

फ्रान्स
फ्रान्स पण भारताच्या मदती धावून आला आहे. मेडिकल ऑक्सिजन भारताला पुरवणार असल्याची माहिती मिळाली आहे. युके पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच भारताला मदती करणार असल्याचं ट्विट समोर आल्यानंतर फ्रान्सनेही मदतीसाठी हात पुढे केला आहे,

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...