विदर्भात रुग्णांची संख्या ७५ हजारावर; २, ३८७ नवे रुग्ण, ५९ मृत्यू

Date:

नागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सोमवारी २,३८७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ७५,१४१ झाली आहे. तर ५९ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या २,०५८वर पोहचली आहे. आतापर्यंत ४७,८७९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत ६३.७१ टक्केरुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २०,४९७ रुग्ण उपचाराखाली आहेत.

नागपूर जिल्ह्यात १,५५० रुग्ण पॉझिटिव्ह तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून हीच स्थिती आहे. रुग्णांची एकूण संख्या ४१,०३२ तर मृतांची संख्या १,३६५ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २८,६३८ वर गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५२ नव्या रुग्णांची नोंद झाली तर दोन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ४,०५५ तर मृतांची संख्या ४८ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात १५० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या ३,९९५ झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १३९ रुग्णांची नोंद झाली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ४,३९२ झाली असून मृतांची संख्या १२४ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात १०३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या २,१०६ झाली आहे. जिल्ह्यात दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३७ वर पोहचली आहे.

अमरावती जिल्ह्यात ८२ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ७,०८७ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या २,२४४ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात रुग्णसंख्येत किंचीत घट आली. ५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र मृत्यूचे सत्र सुरूच आहे. दोन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३३ झाली आहे.

वर्धा जिल्ह्यात ५७ रुग्ण व दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या १,७७५ तर मृतांची संख्या ३४ वर गेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या १,३०१ झाली आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related