‘व्हीएनआयटी’मध्ये २०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’चा आकडा वाढला , ८६ टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले

Date:

नागपूर : देशातील अग्रणी अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या ‘व्हीएनआयटी’मध्ये २०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’चा आकडा वाढलेला दिसून आला. वर्षभरात पात्र असलेल्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. २०१८-१९ च्या तुलनेत हा आकडा ५६ ने वाढल्याचे दिसून आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘व्हीएनआयटी’कडे विचारणा केली होती. २०१९-२० मध्ये ‘व्हीएनआयटी’मध्ये किती विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले, वर्षभरात किती जागा रिक्त होत्या, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१९-२० मध्ये ‘व्हीएनआयटी’तील ५२१ विद्यार्थी ‘प्लेसमेंट’साठी पात्र होते. १३० कंपन्यांकडून यातील ४४९ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ‘प्लेसमेंट’ची ‘ऑफर’ मिळाली. संगणक विज्ञान व यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. तर स्थापत्य अभियांत्रिकीतील केवळ ५१ टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली.

दरम्यान, २०१९-२० मध्ये १ हजार ४८३ पैकी १ हजार ३५५ जागांवरच प्रवेश झाले व १२८ जागा रिक्त राहिल्या होत्या. २०१८-१९ मध्ये हाच आकडा ९४ इतका होता.

सर्वाधिक पॅकेज ३८ लाखांचे

२०१९-२० साली ‘व्हीएनआयटी’तील विद्यार्थ्यांना सरासरी ८.५५ लाखांचे ‘पॅकेज’ मिळाले. ‘पॅकेज’चा सर्वाधिक आकडा ३८.२१ लाख इतका होता. २०१२-१३ पासूनच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता त्याच वर्षी विद्यार्थ्याला सर्वात अधिक प्रतिवर्ष ६५ लाख रुपयांचे ‘पॅकेज’ मिळाले होते.

‘प्लेसमेंट’ची आकडेवारी

वर्ष- निवड

२०१२-१३ – ३४५

२०१३-१४ – ३८०

२०१४-१५ – ४४२

२०१५-१६ – ३६४

२०१६-१७ – ४२६

२०१७-१८ – ४०१

२०१८-१९ – ३९३

२०१९-२० – ४४९

रिक्त जागा

वर्ष – प्रवेशक्षमता – रिक्त जागा

२०१७-१८ – १,१६६ – १०६

२०१८-१९ – १,४२२ – ९४

२०१९-२० – १,४८३ – १२८

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...