नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शहरात अडकलेल्या लोकांना स्वगृही परतण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शहरात अडकलेले मजूर, विद्यार्थी व अन्य प्रवाशांना स्वगृही परत जाण्यासाठी त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. वैद्यकीय प्रमाणपत्राविना कुणालाही शहराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे परराज्यातील किंवा नागपूर बाहेरील लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मनपातर्फे टोकन प्रणाली सुरू करण्यात आली असून टोकन घेतल्यानंतर दुस-या दिवशी संबंधितांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे. याशिवाय व्यवस्था करण्यात आलेल्या मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये पोलिस बंदोबस्तही आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची मनपाच्या वैद्यकीय चमूमार्फत आरोग्य तपासणी केली जाते. थर्मल गनच्या माध्यमातून व्यक्तीचे तापमान मोजले जाते. स्वगृही परतल्यानंतर संबंधित व्यक्तीला १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. शहराबाहेर जाणा-या व शहरात येणा-या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील मनपाद्वारे घेण्यात येत आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य उपसंचा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली.
या ठिकाणाहून घेता येईल वैद्यकीय प्रमाणपत्र
अ.क्र. | झोन | आरोग्य क्रेंद्र |
१ | लक्ष्मीनगर | सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कांजी हाउस |
जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान मंदिर, जयताळा मनपा शाळेजवळ | ||
२ | धरमपेठ | के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्कर्ष नगर, रिहॅबिलीटी सेंटर जवळ गिट्टीखदान रोड |
फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन फुटाळा गल्ली नं. ३, मनपा शाळेसमोर अमरावती रोड | ||
३ | हनुमाननगर | हुडकेश्वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवाजी कॉलनी नासरे सभागृहाच्या मागे हुडकेश्वर रोड |
४ | धंतोली | बाबुळखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मानवता शाळेजवळ, बाबुळखेडा |
आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा पोलिस स्टेशनच्या मागे इमामवाडा | ||
५ | नेहरूनगर | नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दर्शन कॉलनी गजानन महाराज मंदिराजवळ के.डी.के.कॉलेज रोड |
६ | गांधीबाग | महाल डायग्नोस्टिक सेंटर, नर्सिंग टॉकिज जवळ महाल पोस्ट ऑफिस |
७ | सतरंजीपुरा | मेहंदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंग्ल सेलिब्रेशन रोड देवतारे चौक, राष्ट्रसंत तुकडोजी हॉल जवळ, मेहंदीबाग रोड |
८ | लकडगंज | पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मनपा शाळेजवळ पारडी बस स्थानकाच्या मागे |
९ | आसीनगर | पाचपावली मॅटर्निटी होम, बाळाभाउपेठ, कमाल चौक |
कपीलनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कपीलनगर हिंदी हायस्कूल कपील नगर | ||
१० | मंगळवारी | इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेझनबाग मैदान |
Also Read- 83 Shramik special trains operational since May 1, over 80,000 migrants ferried: Indian Railways