नागपूर : केंद्रीय भुपृष्ठ व जहाज राणी मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या नागनदी येथून बोट धावणार व कोराडी, खिंडसी, अंबाझरी तलाव येथे ‘सी प्लेन’ उतरणार अशा प्रकारचे आश्वासन दिले होते. अध्यापही आश्वासनाची पुर्तता झाली नाही. तोच कोराडी, खिंडसी, अंबाझरी तलाव येथे ‘हायब्रिट एअरो बोट’ धावणार असे आणखी एक आश्वासन गडकरी यांनी नागपुरकरांना दिले.
रशियाच्या ‘IIAAT’ कंपनी व भारत सरकार यांच्यात करार होऊन नागपूरातील कोराडी येथे पाच एकर परिसरात हा प्रकल्प सुरु होणार आहे. २० आसनी ही बोट राहिल. पेट्रोल, इथेनॉल, बॅटरी यावर ही बोट प्रती ८० किमी तासाने धावेल. ही ‘इको-फ्रेन्डली’ बोट असून हिला भारतीय गाडी चे इंजन राहिल. या बोटीचा उर्वरित ढाचा रशियन तज्ञांनी तयार केलेल्या प्रमाणे राहिल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरातील त्यांच्या रामनगर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हा प्रकल्प सुरु झाल्यास विदर्भातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार, असे ही गडकरी म्हणाले. लोकसभा निवडणूकी पूर्वी यशवंत स्टेडियम येथे पावर पॉइंट प्रेझन्टेशन दरम्यान लाखो तरुणाई समोर नागपूरच्या मिहान येथे विदर्भातील ५० हजार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणार असे आश्वासन गडकरी यांनी दिले होते.
अधिक वाचा : महानगरपालिका, जिल्हा परिषद की स्कूल बनी कचराघर