अाशियाई चॅम्पियन भारतीय संघाने घरच्या मैदानावरील हाॅकी मालिकेत विजयाची हॅट्रिक नाेंदवली. यजमान भारताने रविवारी पाहुण्या न्यूझीलंड संघाचा तिसऱ्या अाणि शेवटच्या सामन्यात पराभव केला.
भारताने ४-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. रुपिंदर पाल सिंग (८ वा मि.), सुरेंदर कुमार (१५ वा मि.), मनदीप सिंग (४४ वा मि.) अाणि अाकाशदीप सिंग (६० वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून भारताचा विजय निश्चित केला. न्यूझीलंडच्या खेळाडूंना शेवटपर्यंत सामन्यात एकही गाेल करता अाला नाही. यातूनच या पाहुण्या टीमला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.या सलग तिसऱ्या विजयाच्या बळावर भारताने तीन हाॅकी सामन्यांची मालिका ३-० ने अापल्या नावे केली. याशिवाय भारताने उल्लेखनिय कामगिरी करताना जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड संघाचा मालिकेत धुव्वा उडवला.
सलगच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारताने अाठव्या मिनिटाला सामन्यावरची अापली पकड अधिक मजबुत केली. रुपिंदर पालने भारताकडून गाेलचे खाते उघडले. त्यानंतर सात मिनिटांत सुरेंदरने भारताच्या अाघाडीला २-० ने मजबुत केले. त्यापाठाेपाठ मनदीप अाणि अाकाशदीपने प्रत्येकी एक गाेल केला.
अधिक वाचा : सचिन तेंडुलकर कडून सर्वोत्तम खेळाडूला स्कॉलरशिप!