सचिन तेंडुलकर कडून सर्वोत्तम खेळाडूला स्कॉलरशिप!

Sachin Tendulkar सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने बुधवारी ‘ तेंडुलकर मिडलसेक्स क्रिकेट’ यांच्यासोबत मिडलसेक्स ग्लोबल अकादमी या नविन अकादमीची स्थापना केली. या नविन अकादमीमध्ये नऊ तसेच १४ वर्षाखालील मुल आणि मुलींना क्रिकेटच्या दुनियेत शिकण्याची संधी दिली जाणार आहे. मास्टर ब्लास्टरकडून सर्वोत्तम खेळाडूला स्कॉलरशिप दिली जाणार.

अकादमी स्थापनेच्या कार्यक्रमा दरम्यान मास्टर ब्लास्टरने अनेक उपक्रमांची घोषणा केली आहे. यामध्ये तो म्हणाला, सर्वोत्तम खेळी खेळणाऱ्या खेळाडूला अधुनिक प्रशिक्षाणाच्या सुविधा दिल्या जाणार. तसेच अकादमी द्वारे सर्व मुलांना चांगले प्रशिक्षण दिले जाणार. ही अकादमी सुरू करण्याचा उद्देश केवळ चांगले खेळाडू तयार करणे नसुन एक चांगले देशाचे नागरिक तयार करणे असा ही आहे.

या अकादमी मध्ये क्रिकेट सोबत अन्य खेळाचे मैदान उपलब्ध असणार आहे. यामध्ये टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॉश कोर्ट्स आणि स्वीमिंग पूल अशा खेळांचा समावेश आहे.

तसेच यापुढे सचिन तेंडुलकर म्हणला, ‘तेंडुलकर मिडलसेक्स क्रिकेट’ अकादमीव्दारे ६-७ ऑगस्ट दरम्यान लंडन येथील मर्चंट टेलरच्या शाळेतून पहिले शिबिर घेतले जाणार असुन मुंबई आणि इतर देशांमध्येही ही अकादमीच्या शाखा स्थापन करणार आहे. खरतर अकादमीचे सुरूवात मुंबईपासुन करायची होती पण इथल्या मान्सून हवामानामुळे आम्ही मुंबईत शिबिराची सुरूवात नोव्हेंबरमध्ये करणार आहोत.

मिडलसेक्स ग्लोबल अकादमीने याअधी अनेक दिग्गज खेळाडू तयार केले आहेत. यामध्ये ऍन्ड्र्यू स्ट्रॉस, माईक गॅटिंग, डेनिस कॉम्पटन, जॉन एम्बुरी आणि माईक ब्रेयर्ली या खेळाडूंचा सहभाग आहे.

अधिक वाचा : महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताची आज इंग्लंडशी गाठ