जर तुमच्या लहान मुलांना कोरोना झाला असेल तर काय कराल? केंद्राने दिला सल्ला

Date:

भारतात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर भारतात लहान मुलांना ही आपल्या विळख्यात (Coronavirus in children) घेतलं आहे. मोठ्या संख्येने लहान मुलं संक्रमित होत आहेत. प्रत्येक दिवसाला 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या होत आहे. त्यातच लहान मुलांमध्ये कोरोना पसरत (Corona positive child) असल्याने चिंता वाढली आहे. यामुळेच कोरोना काळात आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांसाठी गाईडलाईन्स (Covid-19 guidelines for kids) जारी केल्या आहेत.

लहान मुलांमधील कोरोना प्रादुर्भाव पाहता आरोग्य मंत्रालयाने 2 डॉक्युमेंट जारी केले आहेत. एक म्हणजे मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याबाबतच्या नव्या गाइडलाइन्स (Revised guidelines) आणि पीडिएट्रिक एज ग्रुप (Paediatric age Group) म्हणजे लहान मुलांच्या उपचारासंबंधी प्रोटोकॉल (Management Protocol).

 

सौम्य संसर्ग असल्यास (Mild infection)

गळ्यात खवखव, घसा दुखणे अशी लक्षणं असतील पण शासोच्छवासाला कोणताही त्रास होत नसेल. म्हणजेच माईल्ड इन्फेक्शन असेल तर, लहान मुलांना होम आयसोलेशन (Home isolation) मध्ये ठेवा. जास्तीत जास्त तरल पदार्थ द्या. त्यामुळे शरीर हायड्रेट रहायला मदत होईल. हलका ताप येत असेल तर, 10 ते 15 mg पॅरासिटामोल (Paracetamol) द्या. मात्र काही गंभीर लक्षणं दिसताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा.

मध्यम संसर्ग (Moderate infection)

ऑक्सिजन लेव्हल कमी असलेले मात्र, न्युमोनियाची लक्षण नसलेल्या मुलांना या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. मध्यम लक्षण असलेल्या मुलांना कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करावं. डिहायड्रेशन टाळण्यासाठी मुलांना पातळ पदार्थ देत रहावेत. ताप आल्यास पॅरासिटामोल आणि बॅक्टेरियल इनफेक्शन असल्यास अमोक्सिसिलिनसाठी दिलं जाऊ शकतं. शरीरात ऑक्सिजन 94% पेक्षा कमी (Low oxygen level) असेल तर मुलाला ऑक्सिजन द्यावा.

गंभीर संसर्ग (Severe infection)

गंभीर इन्फेक्शन असेल तर मुलांमध्ये न्युमोनिया (Pneumonia), रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS), मल्टी ऑर्गन डिसइन्फेक्शन सिंड्रोम (MODS) आणि सेप्टिक शॉक असे गंभीर लक्षण असतील तर अशा मुलांना तात्काळ आयसीयूत किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या कॅटेगरीतल्या मुलांच कंप्लीट ब्लड काउंट, लिव्हर, रीनल फंक्शन टेस्ट आणि चेस्ट एक्स रे करण्याचा सल्ला दिला आहे.

काही लहान मुलांच्या बाबतीत कोरोना संक्रमणानंतरही कोणतीच लक्षण दिसत नाहीत. अशा मुलांवर उपचारासंबंधी काही सांगण्यात नाही आलं आहे. पण त्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...