उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस

Date:

नागपूर : सतत होत असलेल्या खुनांच्या घटना, ३६ तासांत सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांनी भीतीचे वातावरण असतानाच उपराजधानीत चोरट्यांनीही हैदोस घातल्याने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या घरासह सहा ठिकाणी घरफोडी व चोरी करून ११ लाखांच्या रोख रकमेसह सुमारे १९ लाखांचा ऐवज लंपास केला.

रवींद्र वसंतराव थोडगे ( रा. फ्रेंण्ड्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, दिनदयालनगर) हे निवृत्त लेफ्टनंट जनरल व विदर्भ डिफेन्स इण्डस्ट्रियल हबचे अध्यक्ष आहेत. ४ मे रोजी ते कुटुंबासह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे गेले. संधी साधून चोरटा घराच्या मागील भागाने पहिल्या माळ्यावर चढला. गॅलरीच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात घुसला. आलमारीचे कुलूप तोडून लॉकरमधील हिरे ,सोन्याचे दागिने व रोख ५० हजारांची रोख असा एकूण चार लाख ७१ हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास थोडगे यांचे वाहनचालक अतुल वसमतकर हे दिनदयालनगर येथे आले. त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी थोडगे यांच्या मोबाइलवर संपर्क साधून चोरीची माहिती दिली. थोडगे यांनी हबचे संचालक दुष्यत देशपांडे यांना कळविले. देशपांडे यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

—————–

इंडियासनमधून ११ लाखांची रोख चोरी

पुण्याच्या व्यावसायिकाचे सेंट्रल एव्हेन्यूवरील इंडियासन हॉटेलमधून ११ लाखांची रोख लंपास करण्यात आली. या घटनेने हॉटेल व्यवस्थापनात खळबळ उडाली असून तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. सतीश जुगलचंद सेठिया (वय ५८, रा. बोकोडी, पुणे) हे व्यावसायिक व शासकीय कंत्राटदार आहेत. व्यवसायानिमित्त ते ३ मे रोजी नागपुरात आले. इंडियासनमधील खोली क्रमांक ४०५ मध्ये थांबले. बॅगमध्ये त्यांनी ११ लाख ठेवले. ही बॅग खोलीतील आलमारीत ठेवली. शनिवारी कामानिमित्त ते हिंगणा येथे गेले. रात्री हॉटेलमध्ये परतले. रविवारी पहाटे ते उठले. परत जाण्यासाठी बॅगमध्ये कपडे ठेवताना त्यांना रोख गायब दिसली.

रोख चोरी गेल्याबाबत त्यांनी व्यवस्थापकाला विचारणा केली. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिले. सेठिया यांनी तहसील पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. हिंगणा येथे गेले असता बनावट चावीने खोलीचा दरवाजा उघडून चोरट्याने रोख चोरी केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. पोलिस हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी करीत आहेत.

————-

विश्वासनगरमध्ये घरफोडी

विश्वासनगर येथील जमनाबाई गंगाराम श्रीवास (वय ८०) यांच्याकडे घरफोडी करून चोरट्यांनी ५० हजार रुपयांच्या रोख रकमेसह पावणे दोन लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. १८ एप्रिलला श्रीवास या मुलीकडे बालाघाट येथे गेल्या. दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसले. आलमारीतीलसोन्याचे दागिने व रोख चोरी केली. श्रीवास यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. हुडकेश्वरमधील गोविंदनगर येथील रितेश भास्कर गुडधे (वय ४२) यांच्याकडे घरफोडी करून चोरांनी रोख रकमेसह एक लाखाचा ऐवज चोरी केला.

————-

मोठा ताजबामधून दीड लाखांची रोख चोरी

मोठा ताजबाग परिसरात राहणारे सलीम खान युसूफ खान (वय ५०) यांच्या घरात घुसून चोरट्याने आलमारीतील दीड लाखाची रोख चोरी केली. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. सक्करदरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका घटनेत कपिलनगरमधील अन्नपूर्णा किशोर साठवणे (वय४८) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले.

अधिक वाचा : महावितरणचा बुधवारी शटडाऊन

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...