भरमंडपात नवरदेवाने पडल्या नववधूच्या पाया ; काय आहे या मागील रिअल स्टोरी

Date:

आतापर्यंत पती परमेश्वर म्हणून बायको आपल्या नवऱ्याचे पाया पडत आली. पण पहिल्यांदाच एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या पाया पडल्या आहेत. भरमंडपात नवरदेवाने नववधूच्या पाया पडल्या आहेत. वधूच्या चरणी नतमस्तक झालेल्या या नवरदेवाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

लग्नाचे तसे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर असतात तर काही आपलं मन जिंकणारे असाच हा हृदयस्पर्शी फोटो आहे. वधूच्या पाया पडणाऱ्या नवरदेवाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. पण नवरदेवाचं कौतुकही वाटेल. विशेष म्हणजे या फोटोमागील खरी स्टोरी समजली तर तुम्हाला या नवरदेवाचं फक्त कौतुक नाही तर त्याचा अभिमान वाटेल.

डॉ. अजित वरवांडकर यांनी हा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करत म्हटलं आहे, वधू-वराने एकमेकांना वरमाला घातल्यानंतर नवऱ्याने आपलं डोकं वधूच्या पायावर टेकवलं. लग्नातील उपस्थित कुटुंबं, नातेवाईक आणि वऱ्हाडी हे पाहून स्तब्धच झाले.

 

पुढे नवऱ्याने असं का केलं, याचं उत्तर त्यानं दिलं. तेसुद्धा या पोस्टमध्ये डॉ. अजित यांनी सांगितलं आहे.

  1. ही माझा वंश पुढे चालवणार आहे.
  2. माझ्या घरात लक्ष्मी आणणार आहे.
  3. माझ्या आई-वडिलांचा सन्मान करणार आहे, त्यांची सेवा करणार आहे.
  4. मला वडिल होण्याचा आनंद देणार आहे.
  5. प्रसूतीवेळी माझ्या मुलासाठी मृत्यूच्या दारात जाऊन येणार आहे.
  6. तिच्यामुळे माझ्या घराचा पाया आहे.
  7. तिच्यामुळेच समाजात माझी ओळख असेल.
  8. आपल्या आई-वडिलांना सोडून ही माझ्यासाठी माझ्या मागे आली.
  9. आपल्या माणसांसोबत नातं तोडून तिनं माझ्याशी नातं जोडलं.

जर ती इतकं सर्वकाही करू शकते, मग आपण तिला थोडासा सन्मान नाही देऊ शकत का? जर या महिलांच्या चरणी आपलं शीर झुकवणं हास्यास्पद आहे तर मला जगाची पर्वा नाही, असं या नवरदेवानं सांगितलं.

ही पोस्ट पाहून, त्यातील फोटो पाहून आणि नंतर या फोटोमागील खरी स्टोरी समजताच त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. या फोटोनं नेटिझन्सचं मन जिंकलं आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...