जैन समाजाच्या विरोधानंतर बोकडांची निर्यात रद्द

जैन समाजाकडून झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारनं संयुक्त अरब अमिरातीला बोकडांची निर्यात करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे.

नागपूर विमातळावरून थेट संयुक्त अरब अमिरातीला बोकडांची निर्यात करण्याचा सरकारचा मानस होता. ‘मनी कंट्रोल‘ या वेबसाईटनं ही बातमी दिली आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं निर्यातविषयक प्रकल्पात पुढाकार घेतला होता. धनगर समाजाचे नेते आणि खासदार डॉ. विकास महात्मे हे या प्रकल्पासाठी सक्रिय होते. वाचा – विदेश में भेड़-बकरियां निर्यात के फैसले का जैन समाज ने RSS मुख्यालय पर मोर्चा निकालकर किया विरोध प्रदर्शन

या उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसंच शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसा मिळेल अशी योजना होती. साधारण 2000 बोकड नागपूरहून पाठवले जातील असं ठरलं होतं.

मात्र जैन समाजानं या निर्यातीला प्रखर विरोध केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर यासाठी मोर्चाही काढण्यात आला.

शेतकऱ्यांचे उत्पन वाढवण्याचे अन्यही मार्ग आहेत. बोकडांना कत्तलखान्यात देण्याची काहीही गरज नाही, असं जैन समाजाच्या डॉ. रिचा जैन यांनी सांगितलं.