नागपुर :- गोंड राजे बख्त बुलंदशहा उईके यांच्या जयंती निमित्त नगरीचे उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी विधान भवन चौक स्थित गोंडराजाच्या प्रतिमेला म.न.पा.च्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेविका आशा नेहरु उईके, रश्मी उईके, माजी उपमहापौर श्री.कृष्णराव परतेकी, सिनेट सदस्य श्री.दिनेश शेराम, भिमराव मडावी, असलभाई अन्सारी, विजय मसराम, रामभाऊ धुर्वे, मनोज उईके, राकेश उईके, सुरेश वरखडे, दिप्ती सय्याम, स्नेहा सय्याम, मनोज उईके, प्रशांत दोरसवार आदि उपस्थित होते.
गोंड राजे बख्त बुलंदशहा उईके यांनी नागपुर ची स्थापना जवळ जवळ 316 वर्षा पूर्वी सन 1702 मध्ये यांनी प्रथम केलि होती. औरंगजेब सोबत भेटल्या नंतर बख्त बुलंद शाह देवगढ़ येथून नागपुर ला आले अणि येथील 12 गांव एकत्र करुन त्यांनी नागपुर नगरी ची स्थापन केली. या 12 गांवा मध्ये त्यावेळी राजापुर, रायपुर, हिवरी, हरिपुर, वानडे, सक्करदरा, आकरी, लेडरा, फुटाला, गाडगे, भानखेडा, सीताबर्डी, शामिल होते.कालांतराने या काही गावांचे नाव बदलविण्यात आले. त्यांनी गावांचे मुख्य मार्ग जोडले आणि आवश्यकते अनुसार शहरात बाजार निर्माण केले या प्रकारे नागपुर शहराचा हळु हळु विकास होत गेला
हेही वाचा : डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती समारोह का शानदार शुभारंभ