सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा लेटेस्ट दर..

gold

मुंबई: सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात १० ग्रॅम (१ तोळं) सोन्यामागे ३३० रुपयांची घसरण झाली असून ४८,००० रुपये इतका भाव झाला आहे.

Good Returns वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ४८,००० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४९,३३० रुपये मोजावे लागतील. २६ आणि २७ जानेवारी रोजी सोन्याचे दर स्थिर राहिले होते.

गेल्या आठवड्यात २३ जानेवारीला प्रति १० ग्रॅम सोन्यामागे २३० रुपयांची घट झाली होती. त्यानंतर आज जानेवारी महिन्यातील सर्वाधिक ३३० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर

मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात २२ कॅरेट सोन्यासाठी ४८ हजार रुपये मोजावे लागतील. तर देशात बंगळुरू, केरळ आणि हैदराबादमध्ये सर्वात कमी ४५,७५० रुपये इतका दर नोंदविण्यात आला.