Gold Rate : अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने स्वस्त, वाचा नवे दर

३५ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने पॉलिशला दिले, कारागीर झाला पसार

नवी दिल्लीः अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2021) आधी सोने विकत घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बुधवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) मोठी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींच्या कमकुवततेमुळे दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव 229 रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याप्रमाणेच चांदीचीही घसरण झाली. एक किलो चांदीची किंमत 717 रुपयांनी घसरली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते डॉलरची मजबुती आणि अमेरिकन बॉन्ड उत्पन्नाच्या वाढीचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय. (Gold Rate Today: Gold Price Down 229 To Rs 47074 Per 10 Gram 12 May 2021 Before Akshaya Tritiya)

सोन्याची नवीन किंमत (Gold Price on 12 May 2021)
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव 229 रुपयांनी घसरून 47,074 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागील व्यापार सत्रात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,303 रुपयांवर बंद झाला होता.

चांदीची नवीन किंमत (Silver Price on 12 May 2021)
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत बुधवारी 717 रुपयांनी घसरून 70,807 रुपये प्रतिकिलोवर गेली. गेल्या व्यापार सत्रात चांदीचा भाव 71,524 रुपये प्रतिकिलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती खाली आल्यात. सोन्याचा भाव प्रति औंस 1832 डॉलर होता, तर चांदीचा भाव औंस 27.38 डॉलर होता.

सोन्याला झळाळी का मिळाली?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, डॉलरमधील मजबुती आणि बाँडच्या उत्पन्नामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला. त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, यूएस ट्रेझरी यील्ड्समधील वाढ आणि डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या किमती तीन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेल्या. सेफ हेवन अपीलला यामुळे धक्का बसला. यूएस सीपीआय डेटा आज जाहीर होण्याची प्रतीक्षा गुंतवणूकदार करीत आहेत.