बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील, विलासरावांच्या जयंतीला जेनेलियाची भावूक पोस्ट

Date:

वडिलांच्या जागी असलेले सासरे विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाने दरवर्षीप्रमाणेच खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. (Genelia Deshmukh Vilasrao Deshmukh)

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज (26 मे) 76 वी जयंती. सासऱ्यांच्या जयंतीनिमित्त अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने खास फोटो शेअर केला आहे. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील, अशा आशयाचं कॅप्शन जेनेलियाने दिलं आहे. जेनेलियाच्या फोटोवर अनेक जणांनी विलासरावांच्या आठवणी जागवल्या आहेत. (Actress Genelia Deshmukh Riteish Deshmukh shares Emotional Post on Birth anniversary of Father in law Vilasrao Deshmukh)

अभिनेत्री जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मदर्स डेला आईसोबतच सासूबाईंविषयी प्रेम व्यक्त करणारी पोस्ट असो, किंवा नवरोबा- अभिनेता रितेश देशमुखसोबत (Riteish Deshmukh) खट्याळ-मिश्किल डान्स व्हिडीओ. जेनेलियाच्या इन्स्टाग्राम-ट्विटर पोस्टची नेहमीच चर्चा असते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वडिलांच्या जागी असलेले सासरे विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाने दरवर्षीप्रमाणेच खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...