नागपूर- यू ट्युबवरून वाहन चोरीचे प्रशिक्षण घेऊन रेसिंग बाइक चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला गिट्टीखदान पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन रेसिंग बाइक व मोपेड जप्त करण्यात आली.
१७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालक खासगी काम करतो. त्याला दारू व जुगाराचे व्यसन आहे. याशिवाय त्याच्या दोन मैत्रिणीही आहेत. त्यांना ‘इम्प्रेस’ करण्यासाठी या अल्पवयीनाने रेसिंग बाइक चोरी कशी करायची, याचे प्रशिक्षण यू ट्युबवरून घेतले. त्यानंतर त्याने एकामागून एक दोन रेसिंग बाइक व मोपेड चोरी केली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी चोरीचे गुन्हे दाखल केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साजिद अहमद, हेडकॉन्स्टेबल युवराज ढोले, शिपाई संतोष उपाध्याय, इमरान शेख, संतोष शेंद्रे, आशिष यांनी चोरट्याचा शोध सुरू केला. अल्पवयीन मुलगा चोरी करीत असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली व मोपेड जप्त केली. बालकाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
Also Read- Just Blouses opens new store in Nagpur