नगरपंचायत नगरसेवकांना द्या भत्तावाढ

नगरपंचायतच्या नगरसेवकाच्या मासिक भत्त्यात व वॉर्ड निधीत वाढ करण्याचे निवेदन नगर

नागपूर नगरपंचायत

नागपूर ‘राज्यात अस्तित्वात आलेल्या नागपूर नगरपंचायतच्या नगरसेवकांना सध्या मिळत असलेल्या मासिक भत्यात वाढ करावी,’ अशी मागणी ‘प्रहार जनशक्ती पक्षा’चे कोराडी\R-महादुला नगरपंचायतचे नगरसेवक मंगेश देशमुख यांनी केली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. यासोबतच नगरसेवकांना वॉर्डातील कामाकरिता दोन लाख निधी मिळावा. अशी मागणीही करण्यात आली आहे.

सध्या नगरसेवकांना मासिक सभेला उपस्थित राहण्यासाठी १०० रुपये भत्ता दिला जातो. नगरसेवक हे शहरातील मतदारांनी निवडून दिलेले पद आहे. त्यांना शहरातील त्यांच्या वॉर्डातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता जिल्ह्याच्या व तालुक्यांच्या ठिकाणी जावे लागते. अशावेळी प्रवासात अधिकचा खर्च होतो. नगरपंचायतच्या नगराध्यक्षाला सध्या ५ हजार रुपये मासिक भत्ता दिला जातो. उलटपक्षी, नगरसेवकाला केवळ १०० रुपये असतो. नगरसेवकांना समाजसेवा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नगरपंचायतचा नगरसेवक सुमारे तीन हजारांवर मतदारांचे प्रतिनिधित्व करतो. वॉर्डातील विकास कामांसाठीही अल्पनिधी मिळतो. त्यामुळे नगरसेवकांच्या मासिक भत्त्यात व वॉर्ड निधीत वाढ करावी, अशी मागणी नगरसेवक मंगेश देशमुख यांनी केली आहे.

Also Read- ‘दुरंतो’ आजपासून नागपूर स्थानकावरून