सहा महिन्यांत ८५ नागपूरकरांची २५ लाखांनी फसवणूक

Date:

नागपूर : नवीन वस्तूंची ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांप्रमाणेच जुन्या वस्तूंचीही ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील सहा महिन्यांत ओएलएक्सवरून ८५ नागपूरकरांना गंडा घातला गेला आहे. सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. वस्तू विकणाऱ्यांनी, सैन्यात असून बदली झाल्याने शहर सोडत असल्याचे भासवून ऑनलाइन रक्कम उकळली आहे.

नवीन वस्तूंचे बजेट नसते. जुनी पण चांगली वस्तू कमी दरात मिळत असल्यास ती घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. ओएलएक्स हे जुन्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीची ऑनलाइन पोर्टल आहे. दुचाकी-चारचाकी वाहन, मोबाइल, सोफा, पलंग, टीव्ही, फ्रिज वॉशिंग मशिनपासून कपडेही ओएलएक्सवरून खरेदी केली जाते. सुरुवातीला विद्युत उपकरणांसाठीच प्रसिद्ध असलेल्या या साइटवर जुन्या फर्निचरचाही मोठा साठा विक्रीस उपलब्ध आहे. बाहेरगावी शिकणारे विद्यार्थी तसेच जुने वाहन खरेदीचे स्वप्न बाळगणारे या वेबसाइटला भेट देतात. यावरील खोट्या जाहिरातीला अनेक बळी पडले.

‘माझी दुसरीकडे पोस्टिंग झाली आहे. त्यामुळे सहा महिने वा एक वर्ष जुनी गाडी विकायची आहे.’ ‘मला मोबाइल गिफ्ट मिळाला आहे. माझ्याकडे आधीच नवा फोन असल्यामुळे विकायचा आहे.’ ‘मला लग्नात ही ही वस्तू गिफ्ट मिळाली आहे. आता दोन वस्तूंचे काय काय करणार म्हणून विकायची आहे’ असे सांगत ग्राहकांना आकृष्ट केले जाते. वस्तू कंटेनरने पाठवतो, पार्सलने लावतो, विश्वास ठेवा अशी आश्वासने दिली जातात. वस्तू खरेदी करण्यासाठी विचारपूस करणाऱ्यांना व्हॉट्सअॅपवर गाडीचे तसेच सैन्यात कार्यरत असल्याचे फोटोही पाठविले जातात. खरेदी करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंचे दर अत्यल्प ठेवतात. या सापळ्यात ग्राहक अडकतात. १५ हजार, २० हजार, किमान ५ हजार रुपये पेटीएम, गुगल-पे, भीम अॅपच्या माध्यमातून ट्रान्सफर करा, मी वस्तू पाठवतो असे सांगत पैसे उकळण्यात आल्याची ही प्रकरणे आहेत.

अशी घ्या काळजी

– कोणतीही वस्तू प्रत्यक्षात न बघता त्यासाठी कुणलाही पैसे ट्रान्स्फर करू नयेत.

– वाहन दुसऱ्या शहरात असल्यास तरी त्या व्यक्तीची आणि वाहनाची पडताळणी करावी. नंतरच व्यवहार करावा. दुसऱ्यांच्या गाडीचे फोटो ओएलएक्सवर अपलोड करूनही अनेक नागरिकांची फसवणूक झाली आहे.

– माझी बदली झाली आहे म्हणून वस्तू विकतोय किंवा मला गिफ्ट मिळाले आहे म्हणून विकतोय या कारणामुळे अनेकांची फसवणूक झाली आहे. असे कुणी सांगत असल्यास खबरदारी घ्या.

– पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने लिंक पाठविली असल्यास ती कॉपी करून नोटपॅडमध्ये सेव्ह करून ठेवावी, कारण त्याच्या आयपी अॅड्रेसवरून ट्रेस करता येऊ शकते.

– सर्च इंजिन ऑप्टीमायझेसन आणि गुगल अॅड्स वापरून अनेक खोट्या जाहिरातील वेबसाइटच्या शीर्षस्थानी दिसतात. त्यामुळे त्यावर क्लिक करून वैयक्तिक माहिती त्यात भरण्यापूर्वी लिंक तपासून घ्या.

जुन्या वस्तू कमी दरात मिळत असल्याने नागरिक भूलथापांना बळी पडतात. कुठलीही वस्तू स्वत: बघितल्याशिवाय किंवा विकणाऱ्या व्यक्तीची पडताळणी केल्याशिवाय व्यवहार करू नये. पैसे बोलविण्यासाठी अनेक प्रकरणांमध्ये दुसऱ्यांच्या खात्याचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

– विजय करे, पोलिस निरीक्षक, सायबर सेल नागपूर

अधिक वाचा : सीबीएसई इस सत्र से स्टूडेंट्स के लिए शुरू करेगा 59 नए कोर्स

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...