पुणे : पुण्यात भारतीय सैन्यातील चार कर्मचाऱ्यांनी लष्कराचा रुग्णालयात एका मूकबधीर महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. आता यावर चारही सैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने इंदोरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तक्रार दाखल केली आहे. त्यासंबंधीचं एक पत्र संरक्षण मंत्री आणि सेनापतींनाही पाठवण्यात आलं आहे. या घटनेची पीडितेनं तक्रार दाखल केल्यानंतर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहे.
मात्र, या चार कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेनं सुरक्षा मंत्रालय, लष्करप्रमुखांकडे धाव घेतली होती. त्यानंतर सुरक्षा मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून पीडित महिलांसाठी कार्यरत असलेली पोलीस हेल्पलाईन इंदूर इथं पोहोचली असून इंदूर डीआयजीने या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिलं होतं.
पुण्यातील लष्कराच्या रुग्णालयामध्ये एका मूकबधीर दिव्यांग महिलेसोबत अत्याचाराची घटनासमोर आलीये. या प्रकरणी पीडित महिला न्याय मिळावा यासाठी इंदुरला पोहोचली. या पीडित महिलेनं पोलीस हेल्पलाईन प्रभारी पुरोहित दाम्पत्यांकडे मदत मागितली. डीआयजीकडे तक्रार दाखल केल्यानंतर डीआयजीने मदत करण्याचं आश्वसान दिलंय.
पीडित महिला ही पुण्यातील खडकी येथील लष्कराच्या रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करते. या पीडित महिलेला सर्वात आधी रँक नायकने २०१४ मध्ये धमकी देऊन अत्याचार केले. त्यानंतर या पीडित महिलेनं याच रुग्णालयातील नर्सिंग असिस्टंटला एसएमएस करून आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. परंतु, नर्सिंग असिस्टंटने मदत करण्याचे आश्वासन देऊन पीडित महिलेवरच अत्याचार केला. त्यानंतर वारंवार या पीडित महिलेवर दोन्ही कर्मचाऱ्यांनी अत्याचार केले.
हा अत्याचार एवढ्यावरच थांबला नाही तर याच रुग्णालयातील रुग्नवाहिकेच्या कर्मचाऱ्यानेही पीडित महिलेवर अत्याचार केले. याची तक्रार पीडित महिलेनं जेव्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापकांकडे केली पण त्यावर कोणताही कारवाई करण्यात आली नाही. पीडित महिला ही विवाहित असून तिला एक १२ वर्षांचा मुलगा आहे. पत्नीच्या निधनानंतर ही पीडित महिला उदनिर्वाहासाठी रुग्णालयात काम करतेय. पण याच रुग्णालयात वारंवार तिच्यावर अत्याचार झाले. रात्रपाळीला काम करणाऱ्या या पीडित महिलेनं जेव्हा आपली शिफ्ट बदलू मागितली असता ती बदलून देण्यात आली नाही.
आपल्यावर झालेल्या या अत्याचारानंतर पीडित महिलेनं न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत असताना इंदुर येथील पुरोहित दाम्पत्याची माहिती मिळाली. त्यानंतर या पीडितेने जुलै महिन्यात त्यांच्याशी संपर्क साधला. संपर्क झाल्यानंतर पीडित महिलेसोबत घडलेल्या घटनेची माहिती संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन आणि लष्कर प्रमुख व्ही.के. रावत यांना सांगितली.
संरक्षणमंत्री आणि लष्कर प्रमुखाने याची दखल घेल्यानंतर विभागीय चौकशीचे आदेश दिले. पण पीडितेला अद्याप न्याय मिळाला नाही. त्यानंतर मदत मिळवण्यासाठी पीडित महिलेनं इंदुर गाठले. इथं पुरोहित दाम्पत्याची भेट घेऊन डीआयजी हरीनारायण चारी मिश्र यांची भेट घेतली. डीआयजी मिश्र यांनी पुणे इथं जाऊन तेथील पोलीस अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देण्याचे सांगितलंय. तसंच डीआयजीने पीडितेची तक्रार निवारण करण्याचं आश्वासनही मिश्र यांनी दिलं. सैन्य आणि जवानांच्या अधिकाऱ्यांवर देशांच्या संरक्षणाची जबाबदारी असते. पण सैन्याच्या कर्मचाऱ्यांनी महिलेवर अत्याचार केल्यामुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीडित महिला ही दिव्यांग असल्यामुळे तिची बाजू समजून घेण्यास अडचणी येत आहे. तिची भाषा समजून घेण्यासाठी सांकेतिक भाषा अभ्यासकांनाही बोलावण्यात आलं होतं पण तेही पूर्ण बाजू समजू शकले नाही. त्यामुळे पुण्यातून या पीडित महिलेनं इंदुरमध्ये न्यायासाठी धाव घेतली.
अधिक वाचा : मुंबईतील मॉडेलची हत्या; मित्रानेच केला खून