नागपूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वाटत असली किंवा रिकव्हरी रेट जरी जास्त दिसत असला तरी संक्रमण वाढले आहे. शहरात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. स्वत:वर बंधने घालून जबाबदारीने उद्या शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
शहरातील कोविडचा धोका वाढत असतानाच संक्रमणाची साखळी खंडित करणे आवश्यक आहे. बेजबाबदारपणे रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या काही लोकांमुळे नियमांचे पालन करणाऱ्यांचाही जीव धोक्यात आला आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी, नागरिकांनाही शिस्त लागावी यासाठी शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या सूचनेवरून संदीप जोशी यांनी १९ व २० सप्टेंबर आणि २६ व २७ सप्टेंबर रोजी जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली होती. १९ व २० सप्टेंबर रोजी लागू करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूमध्ये शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. मात्र काही ठिकाणी बेजबाबदार वर्तनही दिसून आले. दुसरा जनता कर्फ्यू शनिवारी आणि रविवारी रोजी घोषित केला आहे.
सुरक्षेसाठी जनता कर्फ्यूचे पालन करा : महापौरांचे आवाहन
Date: