नागपूर : अमिताभ बच्चन व हेमा मालिनीच्या सुपरहिट ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक लवकरच बनणार आहे. या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता शाहरूख खान दिसणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका व दिग्दर्शिका फराह खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फराह खाननं ‘सत्ते पे सत्ता’ च्या रिमेकमधील मुख्य भूमिकेसाठी शाहरुखला विचारले. शाहरुखदेखील ही भूमिका साकारण्यास उत्सुक आहे. शाहरुखचे गेले काही चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने तो कमबॅकसाठी एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे आणि सत्ते पे सत्तापेक्षा उत्तम स्क्रिप्ट त्याला मिळू शकत नाही असं त्याला वाटते.’
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हेमामालिनीच्या भूमिकेसाठी फराहनं अभिनेत्री कतरिना कैफला विचारले आहे. पण कतरिना सध्या ‘भारत’ च्या प्रमोशमध्ये व्यग्र असल्याने ती त्यानंतर या ऑफरबद्दल विचार करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक वाचा : दीपांती बनीं नागपुर की प्रथम साइकिल मेयर