नागपूर (प्रतिनिधी): शहरात प्रख्यात एम्प्रेस मॉल मध्ये N सलून येथून चालनाऱ्या देह व्यापाराचा सामाजिक सुरक्षा शाखे च्या( SSB ) पथकाने, एम्प्रेस मॉलसह ,कळमना येथे सुरु असलेले देह व्यापाराच्या अड्डाचा पर्दाफाश केला. प्रथम कारवाई गांधीसागर तलाव येथील एम्प्रेस मॉलमध्ये करण्यात आली. सामाजिक सुरक्षा शाखेला मॉलमधील पहल्या माळ्यावर असलल्या ‘ N सलुन अॅण्ड स्पा’मध्ये देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाली. स्पाची मालक दर्शना उर्फ खुशी अनिल धकान (३५) रा. काचीमेट वाडी आहे. पोलिसांनी धाड टाकण्याची योजना आखली. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता डमी ग्राहक स्पामध्ये पाठवण्यात आला. खुशीने दीड हजार रुपयात एका तरुणीचा सौदा केला. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकून खुशीला पकडले. स्पा मध्ये तीन तरुणी सापडल्या. एक तरुणी दिल्लीची राहणारी आहे. पोलिसांनी स्पा मधून मोबाईल, रुपये आणि रजीस्ट्रर जप्त केले. अड्ड्यावर सापडलेल्या तरुणीचा विचारपूस केल्यावर पोलिसांनी खुशीला ताब्यात घेतले. खुशीला आॅक्टोबर २०१७ मध्ये सुद्धा वाडीमध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवतांना पकडले होते. सुटल्यानंतर तिने अड्डा बंद केला होता. यानंतर एम्प्रेस मॉलमध्ये स्पा च्या नावावर देह व्यापार करू लागली. तिने ५० हजार रुपये महिना भाड्याने स्पा घेतला होता.
दुसरी कारवाई झोन पाचच्या विशेष चमूने कळमना येथे सुरु असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर केली. येथे एक महिला आणि आॅटोचालकास पकडले. पोलिसांना कविता बांदे ही महिला देह व्यापार चालवित असल्याची माहिती मिळाली होती. या आधारावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून कविताशी संपर्क साधला. त्याने दोन हजार रुपयात तरुणीचा सौदा केला. कविताने ग्राहकास आरोपी स्वीटी बागडे हिच्या घरी जाण्यास सांगितले. कविताने आॅटो चालक शेख कलीम शेख मुनीर (३२) रा. शेखनगर खरबी याच्यासोबत तरुणीला स्वीटीच्या घरी पाठवले.डमी ग्राहकाने इशारा करताच पोलीसांनी धाड टाकून स्वीटी आणि कलीमला पकडले. त्यांच्याकडे तरुणीही सापडली.
कविता अनेक दिवसांपासून देह व्यापाराशी जुळलेली आहे. तिला यापूर्वीही पकडण्यात आले होते. ती नुकतीच जामिनावर सुटून आली आहे. त्यामुळे ती ग्राहकांना स्वत:च्या घरी बोलावण्याऐवजी स्विटीकडे पाठवते. आॅटोचालक तिच्या टोळीशी जुळलेला आहे. तो तरुणीला अड्ड्यावर पोहोचवण्याचे काम करतो. आरोपींच्या विरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ओमप्रकाश सोनटक्के, पीसीआय जितेंद्र ठाकूर, कर्मचारी राजकुमार जनबंधू, महेश बावणे, पंकज लांडे, विनोद सोनटक्के, सूरज भारती, प्रमोद वाघ, दिनेश बाने यादव, प्रभाकर मानकर, रवींद्र राऊत, मृदुल नागरे, दयाराम आणि सुजाता यांनी केली.