आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोगय योजनेचा रविवारी शुभारंभ

3 लाख 77 हजार कुटुंबांना योजनेचा लाभ

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

नागपूर : प्रधानमंत्री आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे उद्घाटन रविवार, दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे होणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील उद्घाटन सोहळा बचत भवन येथे सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्यात नोंद झालेल्या लाभार्थ्यांपैकी निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात या योजनेच्या ई-कार्डाचे वाटप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या योजनेत पात्र लाभार्थी कुटुंबासाठी 5 लाख रुपये वर्षातून एकवेळा उपचारासाठी मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात या योजनेचे 3 लाख 77 हजार लाभार्थी आहेत. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व डागा स्मृती महाविद्यालयाचा या योजमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

आयुष्यमान भारत या योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने तसेच सर्व विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त विरेंद्र सिंग तसेच मुख्य कार्यकारी आधिकारी संजय यादव यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आरोग्य उपसंचालक संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेंद्र सवाई यांनी केले आहे.

अधिक  वाचा : मनपाचा रोजगार मेळावा बेरोजगार आणि दिव्यांगांना दिशा देणारा : आ. सुधाकर कोहळे