खूप कमी लोकांना माहित आहे कि रिलांयस जियो तुम्हाला घर बसल्या पैसे कमवण्याची संधी देत आहे. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियोने 2020 मध्ये एक सर्विस सादर केली होती, जिच्या माध्यमातून ग्राहक घर बसल्या पैसे कमवू शकतात. या सर्व्हिसचा एक अँड्रॉइड अॅप आहे जो प्ले स्टोरवर Jio POS Lite नावाने उपलब्ध आहे. Jio POS Lite अॅप एक कम्यूनिटी रिचार्ज अॅप आहे, या अॅपच्या माध्यमातून केलेल्या स्वतःच्या आणि इतरांच्या रिचार्जवर तुम्हाला तुम्हाला 4.16 टक्के कमीशन मिळते. चला जाणून घेऊया हे अॅप कसे वापरायचे.
Jio POS Lite द्वारे अशाप्रकारे कमवा पैसे
- सर्वप्रथम प्ले स्टोरवरून Jio POS Lite अॅप इंस्टॉल करा आणि मग ओपन करा.
- त्यानंतर या अॅपला आवश्यक त्या परवानग्या द्या.
- त्यानंतर Register Now वर टॅप करा.
- इथे तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी आणि जियो मोबाईल नंबरची माहिती टाकावी लागेल. त्यानंतर तुम्हाला Recharge Partner वर टॅप करा.
- त्यानंतर खाली दिलेल्या Generate OTP वर टॅप करा. आता तुमच्या जियो नंबरवर एक OTP येईल, तो एंटर करा. आता तुम्हाला नाव आणि ई-मेल आयडी विचारला जाईल.
- इथे तुम्हाला तुमचे लोकेशन देखील सेट करावे लागेल. त्यानंतर टर्म्स अँड कंडीशन्सवर चेक करून Continue वर टॅप करा.
- त्यानंतर लॉगइन वर टॅप करा. तुमचा जियो नंबर एंटर केल्यावर एक OTP येईल, तो एंटर करा.
- वारंवार लॉगइन करावे लागू नये म्हणून तुम्हाला mPIN बनवण्याच्या ऑप्शन येईल.
- तुमच्या आवडीचा पिन तुम्हाला सेट करावा लागेल.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर 4 ऑप्शन दिसतील. यात रिचार्ज, माय अर्निंग्स, ऑप्शन लोड आणि पासबुक यांचा समावेश असेल.
- पहिल्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही कोणत्याही नंबरवर रिचार्ज करू शकता. त्यातून तुमची जी कमाई होईल ती माय अर्निंग्समध्ये दिसेल.
- कोणत्याही नंबरला रिचार्ज करण्याआधी तुम्हाला तुमच्या अकॉउंटमध्ये कमीत कमी 500 रुपयांचा बॅलेन्स अॅड करावा लागेल. यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा ऑनलाइन बॅंकिंगचा वापर करू शकता.
- या अॅपद्वारे केलेल्या रिचार्जवर 4.16 टक्के कमीशन मिळते.