नागपुर : महानगर पालिकेच्या परिवहन विभागाने जुनी थकबाकी थकवल्याने शुक्रवारी शहरात स्टार बस ऑपरेटरने बसेस बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. नागपूर शहरात सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. अशा परिस्थितीत बस सेवा बंद पडल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. महत्वाचे म्हणजे ऐन गणेशोत्सवाच्या काळात नागपूरकरांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
नागपुरातील ‘आपली बस’ या शहर बससेवेची जबाबदारी असलेल्या रेड बसची सेवा शुक्रवारी सकाळपासून बंद होती. त्यामुळे सकाळपासून चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सकाळपासून एकही रेड बस रस्त्यावर धावत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. आपली बसची सेवा पुरविणाऱ्या तीन ऑपरेटरर्स यांना थकबाकी न दिल्याने त्यांनी रेड बससेवा सकाळपासून बंद ठेवली.
माहिती नुसार शहर बससेवा पुरवणाऱ्या तिन्ही ऑपरेटची ४५ कोटींची थकबाकी महापालिककडे आहे. गेल्या महिन्यातही एक दिवस पूर्णवेळ शहर बससेवा ठप्प पडली होती. तेव्हा दीड कोटी रुपये देण्यात आले होते. त्यानंतर सेवा सुरू झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा बससेवा ऑपरेटची थकीत ४५ कोटींपर्यंत पोहचले आहेत.