नागपूर : पोलिसनगरात ऑटोस्टॅण्ड चालकाची हत्या

नागपूर : क्षुल्लक कारणावरून ऑटोचालकांनी ऑटोस्टॅण्ड चालकांची हत्या केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्यीतील पोलिसनगरातील उडीबाबा पानठेल्याजवळ घडली. गणेश शेषराव तांदूळकर (२८, रा. वैशालीनगर) असे या मृतकाचे नाव आहे.

मोनुसिंग (३०, रा. एमआयडीसी), राकेश आणि विक्की ऑटोवाला अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

गणेश हा सीताबर्डी परिसरात ऑटोस्टॅण्ड चालवित होता. या प्रकरणातील आरोपी हे ऑटोरिक्षा चालक आहेत. हे आरोपी येथे ऑटो लावत असता. त्यामुळे आरोपी आणि मृतक यांच्यात ओळख होती. गणेशचा मित्र दिनेश अनेकदा या ऑटोस्टॅण्डवर येत असे. शनिवारी दुपारी दिनेश आणि मोनुसिंग यांच्यात भांडण झाले. धक्का लागल्यावरून हे भांडण झाले होते. दोघांच्या भांडणात गणेशने दिनेशची बाजू घेतली होती. प्रकरण तेव्हापुरते शांत झाले.

मात्र, सर्व आरोपी आणि गणेश रात्री ऑटोस्टॅण्डवरच दारू पिण्यास बसले. सगळ्यांनी दारू पिली. यावेळी गणेश आणि मोनुसिंग यांच्यात परत वाद झाला. मोनू आणि त्यांच्या मित्रांनी दारूच्या नशेत रागाचे भरात तलवारीने गणेशच्या पोटावर, छातीवर, पाठीवर वार केले. गणेश रक्त्याच्या थारोळ्यात पडला. या हल्ल्यात गणेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

अधिक वाचा : Nagpur : Manasi Jangam tops the Dietetics Diploma exam