नागपुर : मी टू च्या वादळाने संपूर्ण चित्रपट नगरीच हादरली आहे. एवढंच नाही तर हे वादळ भारतीय राजकारणावरही भारी पडेल असेच चिन्ह दिसत आहेत. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकरवर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झालेली मी टू मोहीमेच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला जातो आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची आठवण काही दिवसांपूर्वी सांगितली होती त्यामुळे राजकारण यासह कॉर्पोरट जगाला मी-टू मोहिमेची झळ बसली आहे.
या मोहिमेमुळे प्रसिद्ध चेहऱ्यामागील किळसवाणी वृत्तीदेखील समोर आली आहे. चंदेरी दुनियेशी संबंध असलेल्या एखाद्या महिलेने आपल्यावर गुजरलेला प्रसंग १० वर्षानंतर जगापुढे मांडावा आणि त्यानंतर एक मोहीम सुरु व्हावी हे बॉलिवूड मध्ये होणे अपेक्षितच आहे. मी-टू मोहिमेच्या माध्यमातून अत्याचार विरोधात आवाज उठवला जातो आहे, हे कौतुकास्पद आहे. पण या मोहिमेच्या माध्यमातून आरोप करणारी प्रत्येक महिला खरंच बोलत असेल यावर प्रसिद्ध चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. ते मंगळवारी नागपुरात पत्रकारासोबत बोलत होते.
‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. तनुश्री दत्ताने सुरवात केल्यानंतर स्वतःवर अत्याचार झाल्याचे सांगण्याकरिता सोशल मीडियावर उड्या पडत आहेत. सामान्य महिलेने केलेल्या आरोपांना कधीही महत्व न देणारी मीडिया सेलिब्रिटीने केलेल्या आरोपा नंतर आरोप झालेल्या त्या व्यक्ती संदर्भात एक चित्र रंगवू पाहत आहेत, ज्यामूळे त्या व्यक्तीची प्रतिमा डागाळली जात आहे.
आपल्या देशात न्यायपालिका असताना मीडियाने निर्णायक भूमिकेतून पत्रकारिता करणे फार दुर्दैवी आहे. सध्या प्रसार माध्यमे आरोप झालेल्या व्यक्तीला थेट गुन्हेगार ठरवूनच पत्रकारिता करत असल्याची टीका प्रसिद्ध चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी केले आहे.
अधिक वाचा : #MeToo : महिला स्वत:च्या फायद्यासाठी तडजोड करतात; भाजप आमदार उषा ठाकूर