वायफाय सेवा नागरिकांना दोन तास नि:शुल्क उपलब्ध करुन दयावी………महापौर संदीप जोशी

नागपूर: नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनबल ‍सिटी डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (लिमिटेड) ची सिटी लेवल ॲडवाझ्ररीची बैठक नुकतिच नविन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात संपन्न झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर संदीप जोशी होते. बैठकीला पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे , आयुक्त अभिजीत बांगर,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, नगरसेवक दिपक वाडीभस्मे लीना बुधे, तेजेंदरसिंग रेणू, अनुसया काळे छाबरानी आदी उपस्थित होते.

बैठकीला महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीच्या विकास कार्याचा आढावा घेत वायफाय सेवा दोन तासासाठी नागरिकांना नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. आज घडीला स्मार्ट सिटी कडून फक्त अर्धा तास नि:शुल्क वायफायची सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. दररोज सरासरी 40,000 नागरिक सेवेचा लाभ घेत आहेत.

महापौरांनी स्मार्ट सिटीचे इंटरनेट वरुन सर्व दहाही झोनल कार्यालयाला जोडण्याचे सुध्दा निर्देश दिले.

नागपूर पोलिसांना स्मार्ट सिटीच्या सी.सी.टी.व्ही. वरुन आतापर्यंत १,७८१ केसेसमध्ये आरोपींना शोधण्यात मदत झालेली आहे. यापैकी पोलीसांनी ९० हत्याचे गुन्हे शोधण्यात सी.सी.टी.व्ही. ची मदत घेतली आहे.