नवी दिल्ली: रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षी ७८ दिवसांच्या पगारा इतके वेतन बोनस म्हणून दिले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजूरी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गापूजेच्या आधी बोनस कर्मचाऱ्यांच्या बँकेत जमा होईल. यामुळे रेल्वेच्या अर्थसंकल्पावर २ हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
रेल्वेतील राजपत्रित कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जातो. अशा कर्मचाऱ्यांची संख्या ११.९१ लाख इतकी आहे. प्रत्येक वर्षी रेल्वेतील कर्माचाऱ्यांना बोनस दिला जातो. परंपरेनुसार ही रक्कम दसऱ्याच्या आधी त्याच्या खात्यावर जमा केली जाते. कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याचे यंदाचे हे सलग सातवे वर्ष आहे. पण यात रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे सुरक्षा स्पेशल फोर्स यांचा समावेश केला जात नाही.
अधिक वाचा : महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा