नागपूर मनपाचे दवाखानेही होणार ‘कोविड हेल्थ सेंटर’

१ कोटी ९० लक्ष एवढ्या निधीची आवश्यकता; कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नितीन राऊत यांनी हा निधी महापालिकेस देण्यास मंजुरी प्रदान केली आहे.

Isolation hospital Nagpur

नागपूर : नागपूर महापालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे दवाखाने विकसित करण्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होती. या कामासाठी सुमारे १ कोटी ९० लक्ष एवढ्या निधीची आवश्यकता होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नितीन राऊत यांनी हा निधी महापालिकेस देण्यास मंजुरी प्रदान केली आहे.

त्यामुळे आता महापालिकेचा पाचपावली दवाखाना, सदर दवाखाना, केटी नगर दवाखाना, इमामवाडा विलगीकरण केंद्र, इंदिरा गांधी रुग्णालय असे एकूण पाच दवाखाने विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दवाखान्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती. परंतु २८ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कोविड-१९ प्रादुर्भावावरील अनुज्ञेय उपाय योजनांकरिता राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व आरोग्य संस्थांकरिता सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात मंजुरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या आर्थिक मंजुरीमुळे, नागपुरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

Also Read- अनोख्या सायकलिंगद्वारे डॉ.अमित समर्थ यांची मनपाच्या सेवाकार्याला ‘मैत्री’ पूर्ण साथ