तुमच्याकडे असलेली 500 ची नोट असली की नकली? RBI ने सांगितली ओळखण्याची पद्धत

Date:

500 ची नोट हातात आल्यानंतर ती असली-नकली ओळखणं गरजेचं आहे. RBI ने नोटेची ओळख करण्यासाठी मुख्य संकेत सांगितले आहेत. या संकेतांवरुन तुम्ही 500 च्या असली-नकली नोटेतील फरक ओळखू शकाल.

नवी दिल्ली, 2 जून : बाजारात अगदी खऱ्या नोटेप्रमाणेच हुबेहुब दिसणाऱ्या नकली नोटाही फसवणूक करणाऱ्यांकडून दिल्या जातात. त्यामुळे अशा असली-नकली नोटांमधला फरक समजणं कठीण होतं. अशा प्रकरणात सर्वांनाच अलर्ट राहणं गरजेचं आहे. 500 रुपयांची नोट असली-नकली ओळखणं तुम्हाला समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका वार्षिक रिपोर्टमध्ये खोट्या, बनावट नोटांबाबत एक फ्रॉड समोर आला आहे. RBI आणि इतर बँकांमध्ये तब्बल 5.45 कोटी रुपयांहून अधिक बनावट नोटा सापडल्या आहेत.

2020 आणि 2021 दरम्यान RBI आणि इतर बँका मिळून 5.45 कोटी रुपयांहून अधिक नकली नोटा मिळाल्या आहेत. यात 2,08,625 नकली नोटा आढळल्या आहेत, ज्यात RBI ने 8107 आणि इतर बँकांनी 2,00,518 जवळपास 96 टक्के नकली नोटा जप्त केल्या आहेत.

500 ची नोट हातात आल्यानंतर ती असली-नकली ओळखणं गरजेचं आहे. RBI ने नोटेची ओळख करण्यासाठी मुख्य संकेत सांगितले आहेत. या संकेतांवरुन तुम्ही 500 च्या असली-नकली नोटेतील फरक ओळखू शकाल.(वाचा – चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास कसे मिळतील परत? ही आहे प्रोसेस)RBI ने आपल्या Paisa boltahaiसाईट https://paisaboltahai.rbi.org.in/pdf/Rs500%20Currency%20Note_Eng_05022019.pdf वर या संपूर्ण नोटेबद्दल माहिती दिली आहे. हे 17 पॉईंटर्स वाचल्यानंतर तुम्हाला नोटेतील फरत ओळखण्यास मदत होईल.

– नोट एखाद्या लाईटसमोर ठेवल्यास, त्या जागेवर 500 लिहिलेलं दिसेल.

– डोळ्याच्या समोर 45 डिग्री अँगलवर नोट ठेवल्यावर, त्या जागी 500 लिहिलेलं दिसेल.

– देवनागरीमध्ये 500 लिहिलेलं दिसेल.

– महात्मा गांधींचा फोटो एकदम सेंटरमध्ये दाखवण्यात आला आहे.

– भारत आणि India अक्षरं लिहिलेली दिसतील.

– नोट काहीशी हलवली तर, सिक्योरिटी थ्रीडचा रंग हिरवा ते निळा असा बदलताना दिसेल.

– गवर्नर सिग्नेचर, गॅरंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉज आणि RBI लोगो उजव्या बाजूला दिसेल.

– इथे महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्कही दिसेल.

– वरच्या डाव्या बाजूला आणि खाली उजव्या बाजूला नंबर डावीकडून उजवीकडे मोठे झालेले दिसतील.

– इथे लिहिलेल्या 500 चा रंग बदलतो. याचा रंग हिरवा ते निळा होता.

– उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे.

– उजव्या बाजूला सर्कल बॉक्स, ज्यात 500 लिहिलेलं आहे. डाव्या आणि उजव्या बाजूला 5 ब्लीड लाईन्स आणि अशोक स्तंभ, महात्मा गांधींचा फोटो रफली प्रिंट केला आहे.

– नोटेच्या छपाईचं वर्ष लिहिलेलं असेल.

– स्लोगनसह स्वच्छ भारतचा लोगो प्रींट आहे.

– मधल्या भागात भाषेचं पॅनल आहे.

– भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचा फोटो प्रिंट आहे.

– देवनागरीमध्ये 500 प्रिंट आहे.

(वाचा – तुमचं Aadhaar Card फेक बँक अकाउंटला तर लिंक नाही ना? घरबसल्या असं तपासा)
उजव्या बाजूला सर्कल बॉक्स, ज्यात 500 लिहिलेलं आहे. डाव्या आणि उजव्या बाजूला 5 ब्लीड लाईन्स आणि अशोक स्तंभ, महात्मा गांधी फोटो रफली प्रिंट केला आहे. हा पॉईंट अंध व्यक्तींना लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. जेणेकरुन असे लोकही नोटेला हात लावून असली की नकली समजू शकतात. यात अशोक स्तंभ (Ashok Stambh), महात्मा गांधींचा फोटो (Mahatma Gandhi) आणि ब्लीड लाईन (Bleed Line) ओळख चिन्ह (Identification mark) रफली प्रिंट करण्यात आलं आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...