Coronavirus: राज्यात १ लाख ६४ हजार ६२६ रुग्ण; दिवसभरात ५,४९३ रुग्ण तर १५६ मृत्यू

राज्यात १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.

corona rapid test

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ५ हजारांच्या टप्प्यात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी राज्यात ५,४९३ रुग्ण, तर १५६ मृत्यू झाले आहेत. त्याचप्रमाणे, रविवारी २,३३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ८६ हजार ५७५ जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५३.५९ टक्के असून मृत्यूदर ४.५१ टक्के आहे. या मृत्यूंमध्ये मुंबई २३, ठाणे मनपा २, नाशिक ३, नाशिक मनपा ५, पुणे मनपा २०, सोलापूर मनपा ४, सांगली १, रत्नागिरी १, यवतमाळ १ यांचा समावेश आहे.

आजपर्यंत पाठविलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १७.८२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७० हजार ४७५ लोक घरगुती अलगीकरणात आहेत, तर ३७ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

९१ ते १०० वयोगटातील १९१ जणांना लागण

राज्यात ज्येष्ठ नागरिक वा अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. राज्यात ९१ ते १०० वयोगटातील १९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण ०.१३ टक्के आहे. तर १०१ ते ११० वयोगटातील एका व्यक्तीला कोरोना झाला आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर राज्यापेक्षा जास्त

मुंबईत रविवारी १ हजार २८७ रुग्णांची नोंद झाली असून २३ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ७५,५३९ झाली असून मृत्यू ४ हजार ३७१ झाले आहेत. सध्या शहर-उपनगरात २८ हजार ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४३,१५४ इतकी आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर राज्यापेक्षा अधिक असून तो ५८ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर गेल्या आठवडाभरात रुग्णवाढीचा एकूण दर १.७१ टक्के आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ४१ दिवस झाला असून आतापर्यंत ३,१९,९७३ चाचण्या झाल्या आहेत. याखेरीज, पालिकेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत ४ लाख ६२ हजार ६५३ ज्येष्ठ नागरिकांची आॅक्सिजनची पातळी तपासण्यात आली. यातील २ हजार १९५ नागरिकांना औषधोपचार व पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. मुंबईत सध्या ७२८ सक्रिय कंटेनमेंट झोन्स असून ५ हजार ६४६ इमारती सीलबंद केल्या आहेत. तर २४ तासांत अतिजोखीम असलेल्या ६,३०२ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.

Also Read- India, Japan Join Hands for Naval Exercise to ‘Promote Understanding’ Amid Border Tensions with China