भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने(Corona) कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. भारतात गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गुरुवारी २४ तासांमध्ये तब्बल ३ लाख ७९ हजार २५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी ठरत आहे. मागील २४ तासात ३ हजार ६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालया कडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. या २४ तासांत २ लाख ६९ हजार ५०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आतापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. पण वाढता मृत्यूचा आकडा धडकी भरवत आहे, गेल्या २४ तासात ३ हजार ६४५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. ही संख्या पकडून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे.
आता दक्षिण भारतातात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यात जलद गतीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काल मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढून ३० लाख ७७ हजार १२१ इतकी झाली आहे. बरं होण्याचा दर खाली येत असून आता ८२.३३ टक्के झाला आहे, तर मृत्यू दर १.१२ टक्के झाला आहे. तर आयसीएमआरच्या नुसार, २७ एप्रिल पर्यंत देशात २८ कोटी २७ लाख ०३ हजार ७८९ नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मंगळवारी १७ लाख २३ हजार ९१२ नमुन्यांची चाचणी झाली होती.
महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
देशात मागील २४ तासांमध्ये ३ हजार ६४६ जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, राज्यात १०३५ जणांचा मृत्यू झाैला आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीचा नंबर असून तेथे ३६८, उत्तर प्रदेशात २६५ छत्तीसगडमध्ये २७९, कर्नाटकात २२९, गुजरातमध्ये १७४, राजस्थानमध्ये ८५, पंजाबमध्ये १४२, हरियाणा ९५, बिहारमध्ये ८४ लोकांचा मृत्यू झाला आहे. दहा राज्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे ७८ टक्के आहे. दरम्यान देशात सध्याच्या घडीला ३० लाख८४ हजार ८१४ अॅक्टिव्ह रुग्ण असून १५ कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झालं आहे.