नागपुरात कोरोनाचे ८ नवे रूग्ण; रुग्ण संख्या ९८

Date:

नागपूर : नागपुरात कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत बुधवारी सलग चौथ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा शंभरी नजीक पोहोचला आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांची रूग्ण संख्या दर दिवशी वाढतच आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (दि २२ ) नागपुरात कोरोनाचे आणखी ८ नवे रूग्ण आढळले.

गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाला सहकार्य करा! महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : ‘कम्यूनिटी किचन’ ला दिली भेट

रविवारी एकाच दिवशी नागपुरात ९ रूग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी ७ रूग्ण आणि सलग तिसर्‍या दिवशी मंगळवारी ७ रूग्णांची भर पडली होती. त्यात बुधवारी ८ रूग्णांची भर पडून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ९० वरून ९८ वर पोहोचली आहे. या नव्या ८ कोरोना रूग्णांमुळे नागपुरातील कोरोनाबधितांची एकूण संख्या पुन्हा वाढली आहे.

नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत रविवारी सर्वात मोठ्या रूग्ण संख्येची वाढ नोंदविण्यात आली होती. रविवारी एकाच दिवशी नागपुरातील ९ संशयीत रूग्णाचे थ्रॉ स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे उपराजधानीतील जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Also Read- नागपुरातील भालदारपुरा परिसर सील

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...

Happy Baisakhi 2024: Date Significance,Top Wishes & Greetings, More…

Let's look at the Baisakhi Festival 2024. You might...