सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येण्याची गरज : अशोक चव्हाण

Date:

नागपूर :- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेच्या युती सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. आणि त्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या बैठकी झाल्या आहेत. लवकरच आघाडीबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नागपुरात मिट द प्रेस मधे दिली. आज नागपूर प्रेस क्लब येथे अनौपचारिक चर्चेवेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
पुढे बोलतांना चव्हाण म्हणाले की, पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युती सरकारला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत इतर समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी काँग्रेसने इतर पक्षांना प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यांच्याकडून आतापर्यंत कुठलाही प्रतिसाद आलेला नाही. मात्र यासाठी पक्षातर्फे प्रयत्न सुरु असून, लवकरच निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. याशिवाय राज्यातील एकूणच परिस्थितीवर त्यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढले. आज राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून, यासाठी गृहखात्याचे प्रमुख या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर असतांना राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या सरकारने त्वरित लक्ष घालून त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कर्ज उपलब्ध दयावे अशी मागणीही त्यांनी केली.
त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेनेवरही टीका करत शिवसेना सत्तेसाठी किती लाचार आहे हे नाणार प्रकल्पाच्या मुद्दयावरून स्पष्ट होते. एकीकडे पक्षप्रमुख कोकणात जाऊन प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करतात. तर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री प्रकल्प रद्द करणार नाही असे जाहीर करतात. आणि त्यानंतर शिवसेनेकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही. त्यांच्या मंत्र्यांना जाहीर पत्रपरिषदेत प्रकल्पाबाबत बोलण्यास मुख्यमंत्री मज्जाव करतात याला काय म्हणायचे असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी सेनेचा समाचार घेतला.विधानपरिषदेच्या निवडणुकीत वर्तमान सदस्य आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दुसऱ्यांदा संधी नाकारल्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, त्यांच्या पुढील राजकीय भविष्याबाबत मी त्यांना खाजगीत सल्ला देणार आहो. ते माझे चांगले मित्र असून, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी हि आपली मनापासून इच्छा आहे. असेही ते म्हणाले. यासोबतच त्यांनी इतर मुद्द्यांवरही सरकारवर हल्लाबोल करत केंद्र आणि राज्यातील सरकार जनतेच्या प्रशावर अपयशी ठरल्याचे म्हणाले.
Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related