काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, सौम्य लक्षणं दिसल्यानंतर माझी कोरोना टेस्ट झाली, माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना नियमांचे पालन करा आणि सुरक्षित रहा.