देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये राज्यातील ३६ स्थानकांचा समावेश असून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल जाहीर केला. ‘अ-१’श्रेणीमध्ये वांद्रे स्थानकाचा समावेश असून ते सातव्या क्रमांकावर असून देशातील अव्वल दहा स्थानकांत त्याला स्थान मिळाले आहे. या श्रेणीत मुंबई-सीएसएमटी आणि दादर स्थानकांनी सुधारणा केली असून या स्थानकांनी अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
‘स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत’ अहवालांतर्गत ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. या अहवालात देशातील ४०७ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. ‘अ-१’ श्रेणीमधील ७५ रेल्वे स्थानकांत राज्यातील १० रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
रेलवे द्वारा ‘Cleanliness Survey Report 2018’ प्रकाशित की गयी है, जिसका आज विमोचन किया गया, इस रिपोर्ट में देश भर के स्टेशनों को स्वच्छता के आधार पर रैंकिंग दी जाती है, जिससे उनमें स्वच्छता को लेकर प्रतिस्पर्धा बढ़ती है। pic.twitter.com/BDNuuLlKCx
— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 13, 2018
५० कोटींपेक्षा जास्त प्रवासी ज्या रेल्वे स्थानकांतून प्रवास करतात अशी रेल्वे स्थानके ‘अ-१’ श्रेणीत आहेत. ‘अ’ श्रेणीमध्ये ३३२ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. ‘अ-१’ या श्रेणीत पुणे, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकांनाही स्थान मिळाले आहे. देशातील ३३२ रेल्वे स्थानकांमध्ये राज्यातील २६ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. अकोला, नाशिक रोड, दौेंड, बल्लारशाह, अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना, जळगाव, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगांव, औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश झाला आहे.
हेही वाचा : महानिर्मिती ची वीजनिर्मिती घटल्याने ग्राहकांवरील भार वाढणार