नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने मंगळवारी (ता.२८) मनपा मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
महापुरूषांच्या संयुक्त जयंती समारंभानिमित्त मंगळवारी (ता.२८) सायंकाळी ५ वाजता मनपा मुख्यालयातील हिरवळीवर सुप्रसिद्ध विचारवंत सेव्ह द चिल्ड्रन इंडियाचे विभागीय समन्वय अनिरूद्ध पाटील यांचे प्रबोधनात्मक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी ६ वाजता सा रे ग म फेम विजेता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध महागायक अभिजीत कोसंबी यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, माजी महापौर व मार्गदर्शन प्रवीण दटके, कर समिती सभापती संदीप जाधव, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती नागेश सहारे, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, दुर्बल घटक समिती सभापती हरीश दिकोंडवार, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, अग्निशमन व विद्युत समिती सभापती लहुकुमार बेहते, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती अभय गोटेकर, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त अझीझ शेख, अपर आयुक्त राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राजेश मोहिते, उपायुक्त डॉ. रंजना लाडे उपस्थित राहतील. याप्रसंगी सर्व झोनचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, सर्व विभागप्रमुख व सर्व सहायक आयुक्त यांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती नागेश सहारे, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, कार्यकारी अभियंता राजू राहाटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, कर्मचारी नेते राजेश हाथीबेड, विनोद धनविजय, जयंत बन्सोड, विशाल शेवारे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक, दिलीप तांदळे यांनी केले आहे.
अधिक वाचा : राहुल गांधींनी अजून राजीनामा दिला नाही? : गुहा