नागपुर : संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठ्याच नियोजन करणाऱ्या “राज्य भार प्रेषण” केंद्राची पाहणी आणि आढावा बैठक घेण्याच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य प्रवाश्यांशी संवाद साधता यावा म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दुपारी सीएसएमटी ते मुलुंड असा लोकलचा प्रवास केला.
कळवा येथे होणाऱ्या या बैठकीत जाण्यासाठी किमान दीड ते दोन तास रस्ते वाहतुकीने लागणार होते. त्याऐवजी लोकलने प्रवास करून ना. बावनकुळे तासाभरात बैठकीच्या ठिकाणी पोहोचले.
मुंबईच्या लोकल प्रवासाचा एक वेगळा अनुभव घेताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी लोकलमधील प्रवाश्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. त्यांनी लोकल मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधून विचारपूस केली. तसेच लोकलच्या याच डब्यातून प्रवास करणारे व्यापारी, नोकरदार, वृध्द, फेरीवाले यांच्याशी चर्चा केली त्यांची विचारपूस केली. प्रवाश्यांना ऊर्जा मंत्री लोकल प्रवास करीत आहेत हे कळताच सीएसएमटी स्तानकावर प्रवाश्यांनी कुतुहलापोटी गर्दी केली होती.
अधिक वाचा : भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्मर सप्लाई करेगी नागपुर की कंपनी