CBSE : १०वीचे निकाल जाहीर; नोएडाचा सिद्धांत टॉपर

नागपूर : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) इयत्ता दहावीचे निकाल घोषित केले आहेत. इयत्ता १२वीच्या निकालाप्रमाणेच आज इयत्ता १०वीचे निकाल घोषित करत सीबीएसईने सरप्राइझ दिले आहे. आज निकाल घोषित करण्याबाबत सीबीएसईने कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. मात्र, आज अचानक दुपारी ३ वाजता निकाल लावणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. असे असले करी सीबीएसईने २ वाजता निकाल घोषित केले. विद्यार्थी इयत्ता १०वीचा निकाल http://cbseresults.nic.in/class10/Class10th19.htm या साइटवर भेट देऊन पाहू शकतात.

असा पाहा निकाल :

विद्यार्थी सीबीएसईची अधिकृत वेबसाइट results.nic.in, cbseresults.nic.in और cbse.nic.in वर निकाल पाहू शकतात. या व्यतिरिक्त विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट अॅप- एसएमएस ऑर्गनायझरद्वारेही निकाल पाहू शकतात. या साठी त्यांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळेचा कोड रजिस्टर करावा लागणार आहे.

अधिक वाचा : Chardham Yatra set to begin from tomorrow

Comments

comments