पेट्रोलच्या वाढत्या किंमतींचं टेन्शन विसरा, 84 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ तीन बाईक खरेदी करा

Date:

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि महागणाऱ्या गाड्या यामुळे ग्राहकांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, अजूनही असे बरेच ग्राहक आहेत, जे सेकंड हँड बाइकला पहिला पर्याय मानतात. आजकाल बाजारात अशा बर्‍याच वेबसाइट्स आहेत ज्या आपल्याला कमी किंमतीत दमदार फीचर्ससह सेकंड हँड बाईक देतात. अशा परिस्थितीत, आपणदेखील बाईक खरेदी करण्याची योजना आखत असाल तर आम्ही आज आपल्यासाठी तीन उत्तम पर्याय आणले आहेत. (Buy these three bikes and get 84kmpl mileage, check list and details)

वापरलेली बाईक खरेदी करण्यासाठी आपण Droom.in ची मदत घेऊ शकता आणि या साईटवर जाऊन आपल्या पसंतीच्या बाईकची निवड करू शकता. येथे आपल्याला अनेक प्रकारच्या बाईक खरेदी करता येतील. ज्यामध्ये बेसिकपासून ते रेसिंग आणि जास्त सीसी वाल्या गाड्यांचा समावेश आहे. या साईटवर सर्व प्रकारच्या बाइक्स आढळतील. त्याचबरोबर येथे विविध ब्रँडची वाहने विकली जातात. आज आम्ही तुमच्यासाठी जी तीन वाहने घेऊन आलो आहोत त्या उत्तम मायलेज देतात, चला तर मग संपूर्ण यादी जाणून घेऊया.

या बाईकची भारतात मोठी क्रेझ आहे. 2013 चं मॉडेल असलेली ही बाईक फर्स्ट ओनरद्वारे विकली जात आहे. आतापर्यंत ही बाईक 11,000 किमोमीटरपर्यंत धावली आहे. दुसरीकडे, ती बाईक खरेदी केल्यावर, तुम्हाला 65 किमीपर्यंतचं मायलेज मिळेल. या बाईकमध्ये 149 सीसी इंजिन आहे जे 14.85bhp पॉवर देतं. या बाईकचं व्हील 17 इंचांचं आहे. ही बाईक 29000 रुपयांमध्ये विकली जात आहे.

TVS अपाचे RTR 160 4V डिस्क

टीव्हीसची ही रेसिंग बाईक 2019 चं मॉडेल आहे. ही बाईकदेखील फर्स्ट ओनरकडून विकली जात आहे. ही बाईक आतापर्यंत 95,000 किलोमीटरपर्यंत धावली आहे. या बाईकमध्ये 160cc चं इंजिन देण्यात आलं आहे जे 16.10 bhp पॉवर जनरेट करतं. या बाईकचं व्हील 17 इंचांचं आहे. ही गाडी 52,000 रुपयांमध्ये विकली जात आहे.

होंडा ड्रीम Yuga

हे 2019 चं मॉडेल आहे. ही बाईक फर्स्ट ओनरद्वारे विकली जात आहे. ही गाडी आतापर्यंत 12,500 किलोमीटरपर्यंत धावली आहे. ही बाईक 84 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. यामध्ये तुम्हाला 110cc चं इंजिन मिळेल, जे 8.25bhp पॉवर देतं. ही बाईक 43,000 रुपयांमध्ये विकली जात आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Holi 2025 in Nagpur: Find the Best Venues to Celebrate with Colors, Music, and Fun!

Holi 2025 in Nagpur is a celebration of a...

Maharashtra Farmers Demand Biotech Breakthroughs to Boost Cotton, Compete Globally

Nagpur : As the debate over biotechnology in Indian...

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...